ग्रामविकास संस्थेच्या कला महाविद्यालय बामखेडा त.त.येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सूरुवातीस भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्याक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभागातील प्रा.एस.एस.दुथडे होते.
राष्ट्रीय सेवा योजना सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.वाय.सी.गावीत यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. आणि अब्दुल कलामाच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.सी.एस.करंके यांनी डॉ कलाम यांच्या जीवन कार्य कर्तृत्वाचा आढावा मांडला. वाचनातून व्यक्तिमत्व विकास कसा घडतो हे सोदाहरण पटवून दिले. तसेच डॉ.कलाम यांचे मौलिक विचार आजच्या काळात किती महत्त्वाचे आहेत हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.
अध्यक्षीय समारोपातून प्रा.दुथडे यांनी यशस्वी जीवनासाठी विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागाचे अधिकारी डॉ.बी.एन.गिरासे यांनी केले तर आभार प्रकटन राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.के.पी.पाटील यांनी केले.या प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.