21.2 C
New York
Monday, Jun 15, 2026
Bharat Mirror Marathi
नंदुरबार शिक्षा

प्रा. डॉ.अशोक गिरासे यांना राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्कार

शहादा : इंडो ग्लोबल विजन डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन धुळे तर्फे श्री साई बाबा भक्त मंडळ संचलित कला वरिष्ठ महाविद्यालय म्हसावद येथील प्रा. डॉ. अशोक गिरासे यांना राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण, संशोधन, सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नूतन मराठा महाविद्यालय जळगाव येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला. राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.मनोहर पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. कवित्रीबाई बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य  दिलीप रामू पाटील यांच्या हस्ते प्राध्यापक अशोक गिरासे यांना आदर्श शिक्षा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक प्रा डॉ. सचिन नांद्रे, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. सूर्यकांत थोरात, प्राचार्य डॉ. एल पी देशमुख, प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी, प्राचार्य डॉ. प्रमोद पवार, प्राचार्य डॉ. आर एस पाटील प्राचार्य डॉ. राजेश अहिरे, गुरुकुल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.डॉ. संभाजी पाटील प्रा. डॉ. मोहन पावरा आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल श्री साईबाबा भक्त मंडळ संचलित कला वरिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष  आप्पासो विठ्ठल हिरजी चौधरी तसेच संस्थेचे सचिव आप्पासो गणेश नरोत्तम पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज पाटील, प्रा.श्रीराम बनसोडे, प्रा संगीता पटेल, प्रा गणेश पवार, प्रा. गवडे प्रा.कविता भिलावे, हेमराज पाटील, अविनाश पाटील, जितेंद्र पाडवी आदींनी प्रा.गिरासे यांचे अभिनंदन केले .

Related posts

आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी मिनीगोल्फ संघात बामखेडा येथील श्रीकृष्ण बारीची निवड

BM Marathi

जयनगर येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न

BM Marathi

आयर्लंड सरकारने आयरिश संस्‍थांना आणले एकत्र; मुंबईमध्‍ये वैयक्तिक एज्‍युकेशन फेअरचा शुभारंभ

BM Marathi

Leave a Comment