13.6 C
New York
Friday, Apr 18, 2025
Bharat Mirror Marathi
नंदुरबार

कला महाविद्यालयात मधुमेह प्रतिबंधक उपचार शिबिर संपन्न

शहादा,बामखेडा येथील ग्रामविकास संस्थेच्या कला महाविद्यालयात शुक्रवार ,दिनांक 14 ऑक्टोबर, 2022 रोजी परिसरातील नागरिकांसाठी मोफत मधुमेह प्रतिबंधक प्रतिबंधक शिबिर संपन्न झाले. आयुष विभाग दिल्ली प्रायोजित आयुष संचालनालय मुंबई व कर्मवीर व्यं.ता. रणधीर आयुर्वेद महाविद्यालय बोराडी यांच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबिराचे आयोजन केले होते.

परिसरातील नागरिकांमध्ये मधुमेह रोगाच्या संदर्भात जाणिव जागृती व्हावी व प्रारंभीच्या अवस्थेतील मधुमेहाच्या संदर्भात योग्य त्यावेळी उपचार व्हावा म्हणजे पुढील धोके टाळता येतील हे लक्षात घेऊन शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद प्राप्त झाला. या शिबिरामध्ये उपाशीपोटी शरीरातील रक्तशर्करा पातळी, जेवणानंतर दोन तासांची रक्तशर्करा पातळी तसेच मागील तीन महिन्यातील सरासरी साखरेची पातळी (एचबीएवनसी) मोफत पणे तपासली जाऊन आवश्यकतेनुसार उपचार करण्यात आले.

शिबिरासाठी आयुर्वेद महाविद्यालय बोराडी येथील डॉ. राजेश गिरी, डॉ. नरेंद्र मुंढे, डॉ. गणेश कोल्हे, डॉ. संदीप बिरारी,डॉ. उदय पाटील, पॅथॉलॉजी विभागातील कर्मचारी तसेच प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्या गट उपस्थित होता. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा. पी.बी. पटेल यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव मा. बी.व्ही. चौधरी उपस्थित होते.

शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बी.एन. गिरासे यांनी केले.ज्यांची तपासणी झाली त्यांना डॉ. उदय पाटील यांनी मधुमेह व्याधीच्या संदर्भातील आहार विहार आणि योगाचे महत्त्व यासंदर्भात उद्बोधनही केले. या शिबिरामध्ये एकूण 162 नागरिकांनी सहभाग घेतला.

हल्लीच्या काळातील मधुमेह हा अत्यंत संवेदनशील रोग असून यासंदर्भात महाविद्यालयाने राबविलेल्या उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. सदर शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, एन.एस.एस. विभाग समन्वयक डॉ.सी.एस.करंके यांच्या संयोजना अंतर्गत संपन्न झाले.

Related posts

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 विद्यार्थी हिताचे – प्राचार्य डॉ. खैरनार

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात अल्ताफ हसमानी यांचे टॅक्स उदबोधन संपन्न

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात संविधान दिन कार्यक्रम संपन्न

BM Marathi

Leave a Comment