नाशिक, 12 डिसेंबर 2024: महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली असली तरी निवडणुकीचा उत्साह नाशिकच्या एका हाऊसिंग सोसायटीत कायम असल्याचे दिसत आहे. विजय सदन सोसायटीच्या निवडणूक समितीने सोसायटीच्या आगामी निवडणुकांसंदर्भात एक सूचना प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये निवडणुकीत जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोसायटीच्या नोटिशीत सध्याच्या राजकीय परिस्थितीचा संदर्भ घेत, नागरिकांनी मतदान प्रणालीवर टीका न करता आपला हक्क बजावावा असे म्हटले आहे.सोसायटीच्या निवडणुकीसाठी तारीख निश्चित
सोसायटीच्या या निवडणुकीत पुढील तीन वर्षांसाठी कार्यरत राहणाऱ्या व्यवस्थापन समितीची निवड केली जाणार आहे. निवडणूक 15 डिसेंबर रोजी होणार असून, सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत सोसायटी कार्यालयात मतदान केले जाईल.
(मतदानासाठी वेळ निश्चित: मतदान प्रक्रिया सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सोसायटी कार्यालयात पार पडेल.)
विनंती: राजकीय उदाहरणं टाळा
विजय सदन सोसायटीच्या सूचनापत्रामध्ये सध्या देशातील राजकीय परिस्थितीला संदर्भ देत रहिवाशांनी मतदान पद्धतीवर टीका टाळण्याचे आवाहन केले आहे. या सूचनापत्राचे सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केले आहे.
सामाजिक माध्यमांवर मजेशीर प्रतिक्रिया
या सूचनापत्राचा फोटो ‘X’ (माजी ट्विटर) प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला असून, त्यासोबत लिहिले आहे, “नाशिक की विजय सदन सोसायटी कोई पोस्ट-इलेक्शन कलेश का रिस्क नहीं लेना चाहती है.”
Nashik ki Vijay Sadan Society koi post-election kalesh ka risk nahi lena chahti hai💀 pic.twitter.com/M5KNhX4daf
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 10, 2024
या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेक मजेशीर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. एका युजरने लिहिले, “भारता चा विरोधी पक्ष एवढा प्रभावी आहे की आता लोक त्यांचा संदर्भही देऊ लागले आहेत…” तर दुसऱ्याने विचारले, “इथंही EVM वापरणार का?” एकाने तर विनोद करत लिहिले, “भाई, इंग्रजी आणि हिंदीची अशी तशी करून ठेवलं आहे सूचनापत्रात!”
नाशिकमधील ही घटना निवडणुकीसाठी प्रोत्साहन देण्याचा एक वेगळा प्रयत्न असल्याचे म्हणता येईल. या निवडणुकीनंतर सोसायटीचा नवीन कार्यकारी गट कसा ठरेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
(सर्व फोटो: X प्लॅटफॉर्म)