Bharat Mirror Marathi
शिक्षा

बामखेडा महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

ग्रामविकास विकास संस्थेच्या कला महाविद्यालयात सोमवार दि.१६ ऑक्टोबर २०२३ रोजी विद्यार्थी विकास विभागा अंतर्गत प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरासाठी डॉ.योगेश आर.चौधरी यांना आमंत्रित करण्यात आले होते.

शिबिराच्या सुरुवातीला सरस्वती पूजन करण्यात आले. शिबिराचा उद्देश प्रास्ताविकातून विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.सी.एस.करंके यांनी स्पष्ट केला.महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एन.गिरासे यांनी डॉ. योगेश आर. चौधरी यांचा सत्कार केला. त्यानंतर विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली या शिबिरात महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी.ए. व एम ए. या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या शिबिराचा लाभ एकूण १०९ विद्यार्थ्यांनी घेतला.आरोग्य तपासणीनंतर डॉ.योगेश आर. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी आजच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकला. तसेच आहार कसा असावा याविषयी विविध उदाहरणे देऊन आरोग्याची काळजी कशी घ्यायची यावर भाष्य केले.

प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एन.गिरासे यांनी निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत व्यायामाचे महत्त्व स्पष्ट केले.शिबिराची सांगता व्यसनमुक्तीची शपथ घेऊन केली. आभार प्रगटन महिला अधिकारी डॉ.के.पी.पाटील , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related posts

बामखेडा महाविद्यालयात गांधी जयंती साजरी

BM Marathi

शिक्षिका मनीषा कोष्टी यांचा ‘गुणवंत शिक्षिका’ पुरस्काराने गौरव

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात विज्ञान तंत्रज्ञान शाखेची मान्यता

BM Marathi

Leave a Comment