येत्या वीकेण्डला कॉमेडीचा मस्त अनुभवण्यासाठी सज्ज व्हा, कारण शनिवारी रात्री 10.00 वाजता ‘अॅण्ड पिक्चर्स’ वाहिनीवर प्रसारित होणार््या ‘छत्रीवाली’च्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअरद्वारे रकुलप्रीत सिंग ही प्रेक्षकांना हसवून हसवून लोटपोट करणार आहे.
विनोदी चित्रपटाचा प्रेक्षकांच्या मनावर चांगला परिणाम घडतो. अशा काळात ‘छत्रीवाली’सारख्या चित्रपटांतून विनोदाच्या माध्यमाद्वारे महत्त्वाच्या सामाजिक विषयांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचविले जात आहे. या चित्रपटात गुणी अभिनेत्री रकुलप्रीत सिंग आणि सुमित व्यास यांच्यासह राजेश तेलंग आणि दिवंगत सतीश कौशिक या मान्यवर कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. तेजसप्रभा विजय देवस्कर यांनी दिग्दर्शित केलेला ‘छत्रीवाली’ हा चित्रपट त्यातील विनोदाच्या प्रवाहात तुमच्या चेहर््यावर हास्य फुलवील आणि त्यातील कलाकारांचा अप्रतिम अभिनय तुमचे मन प्रसन्न करील.
चाकोरीबाहेरचे विषय निवडण्यात वाकबगार असलेली रकुलप्रीत सिंग ही चित्रपटाचा कणा आहे. तिने या भूमिकेत आत्मविश्वास आणि ऊर्जा ओतली आहे. रकुलप्रीत सिंग म्हणाली, “या चित्रपटात आम्ही एका महत्त्वाच्या प्रश्नाला स्पर्श केला असला, तरी उपदेश देण्याऐवजी तो मनोरंजनाच्या स्वरूपात तो प्रेक्षकांपुढे सादर केला आहे. हा विषय संवेदनशीलतेने हाताळला पाहिजे, असं मला वाटत होतं. म्हणून मी आमच्या दिग्दर्शकाला काही प्रश्न विचारले. त्यांच्याशी बोलल्यावर माझ्या मनातील सार््या शंका मिटल्या.
या चित्रपटाची पटकथा किती स्पष्ट आणि स्वच्छ होती, ते पाहून माझी खात्री पटली. हा संवेदनशील विषय हलक्याफुलक्या पध्दतीने हाताळला आहे. छत्रीवालीची कथा प्रत्येकाने पाहिली पाहिजे, अशी आहे. हा चित्रपट बनविताना आम्हाला जशी धमाल आली, तशीच धमाल अॅण्ड पिक्चर्स वाहिनीच्या प्रेक्षकांना हा चित्रपट पाहताना येईल, अशी मी आशा करते.”
चित्रपटात ऋषी कालराची भूमिका साकारणारा सुमित व्यास हा अतिशय आत्मविश्वासू आहे. या चित्रपटाबद्दल तो म्हणाला, “छत्रीवालीची पटकथा जेव्हा माझ्याकडे आली, तेव्हा तिने मला चकित करून सोडलं. माझ्या आजवरच्या कारकीर्दीत इतकी थरारक आणि सुंदर पटकथा मी पाहिलेलीच नाही. सहसा चर्चिल्या न जाणार््या विषयाला या चित्रपटात हात घातला आहे.
या चित्रपटाद्वारे आम्ही या विषयावर कोणाला उपदेश देत नसून मनोरंजनाच्या माध्यमातून त्या विषयाला सामान्यपणे हाताळण्याचा प्रयत्न करत आहोत. अॅण्ड पिक्चर्स वाहिनीवर प्रसारित होणार््या या चित्रपटाच्या जागतिक टीव्ही प्रीमिअरमुळे मी खूपच उत्साहित झालो आहे.”
छत्रीवाली के साथ मिलेगा एंटरटेन्मेंट का भरपूर डोस इस वीकेण्ड क्यों कि लोगों को समझना है एक आर्ट और इसमें सान्या है फुल-ऑन स्मार्ट! क्या सान्या अपने अंदाझ में कर पाएगी लोगों को कन्व्हिन्स? शनिवारी पाहा ‘छत्रीवाली’चा जागतिक टीव्ही प्रीमिअर फक्त ‘अॅण्ड पिक्चर्स’वर!