येत्या शनिवारी रात्री 9.30 वाजता श्वास रोधून धरायला लावणारा आणि बोटांची नखे कुरतडविणारा तापसी पन्नूचा थरारपट ‘ब्लर’चा जागतिक टीव्ही प्रीमिअर पाहा फक्त ‘ अॅण्ड पिक्चर्स’वर. ‘सेक्शन 375’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन
केलेल्या अजय बहेलनेच ‘ब्लर’चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाद्वारे तापसी पन्नूने चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही
पदार्पण केले आहे. चित्रपटात गुलशन देवय्या आणि अभिलाष थपलियालसारख्या तरूण गुणी कलाकारांनीही भूमिका
साकारल्या आहेत.‘
ज्यूलियाज आय्ज’ या स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक असलेल्या या चित्रपटात तापसीने गायत्रीची व्यक्तिरेखा साकारली आहे.
आपली आंधळी जुळी बहीण असलेल्या गौतमीच्या मृत्यूच्या गूढाशी गायत्री मनातून झगडत असते. गायत्रीची दृष्टीही
हळूहळू नष्ट होत असल्याने तिला गौतमीच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी काळाशी स्पर्धा करावी लागत असते.
आपल्या जुळ्या आंधळ्या बहिणीच्या खुन्याची ओळख गायत्री पटवू शकेल का? की तिचाही पाठलाग होताना तिचाही
मृत्यू होईल? तिच्या कोणा अगदी जवळच्याच व्यक्तीने तिला धोका दिला आहे का? ‘ब्लर’ चित्रपट प्रेक्षकांना अगदी
अनपेक्षित कलाटण्यांच्या वळणांवर घेऊन जातो. चित्रपटाची कथा ज्या प्रकारे सादर केली आहे, ती पाहताना प्रेक्षकांच्या
अंगावर भीतीचे शहारे उभे राहतात आणि ते खुर्चीला खिळून राहतात.
चित्रपटात तापसीची कामगिरी अत्यंत वास्तववादी असून तिच्या व्यक्तिरेखेला अनेक पैलू आहेत. त्यामुळे कथा जशी पुढे
सरकते, तशी प्रेक्षकांना तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक बाजू दिसतात. चित्रपटात तापसीच्या पतीची भूमिका करणारा
अभिनेता गुलशनने आपल्या सूचक, पण शक्तिशाली अभिनयाची चुणूक दाखविली आहे. तर चक्रम स्वभावाची व्यक्तिरेखा साकारताना अभिलाषने त्याच्याबद्दलच्या अपेक्षांपेक्षा अधिक कामगिरी केली आहे.
चित्रपटाबद्दल गुलशन देवय्या म्हणाला, “ब्लर हा सायकॉलॉजिकल थरारपट असून तो एखाद्या भयपटासारखे भीतीचे शहारे अंगावर उठवितो. यात कोणी भूत-प्रेत नसलं, तरी ध्वनी आणि दृष्य माध्यमामुळे प्रेक्षकांना भीतीचा अनुभव येतो.
ब्लर हा जरी ‘ज्यूलियाज आय्ज’ या स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक असला, तरी मी तो चित्रपट मुद्दाम पाहिलेला नाही. कारण एक अभिनेते म्हणून तुमच्या मनात त्या व्यक्तिरेखेविषयी विशिष्ट समजुती रूढ होतात. मला ते टाळायचं होतं.
मी एक अभिनेता असून मला दिग्दर्शकाच्या कल्पनेनुसार भूमिका साकारायची होती. आमचे दिग्दर्शक अजय बहेल यांना या चित्रपटातून नेमकं काय दाखवायचं आहे, त्याची सुस्पष्ट कल्पना होती. त्याचवेळी मला तापसीबरोबर भूमिका साकारताना खूप मजा आली. ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे आणि या चित्रपटाद्वारे तर ती निर्मातीही बनली आहे. ही गोष्ट खरोखरच अभिनंदनीय आहे. आता अॅण्ड पिक्चर्स वाहिनीवर या चित्रपटाचा जागतिक टीव्ही प्रीमिअर प्रसारित होणार असल्याने प्रेक्षकांना एक चांगला चित्रपट पाहायला मिळेल, याची मला खात्री आहे.”
चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिलाष थपलियाल म्हणाला, “या चित्रपटातील माझी भूमिका ही सर्वात कठीण
भूमिकांपैकी एक होती, कारण त्या व्यक्तिरेखेला अनेक पैलू आहेत. खरं तर मी या चित्रपटात दुसरीच भूमिका साकारणार
होतो, त्या भूमिकेत आम्ही काही प्रसंग चित्रीतही केले. पण नंतर अजयसरांनी मला ही भूमिका दिली. त्यामुळे मला
त्याची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळच मिळाला नाही.
एक वेळ अशी होती की मी या भूमिकेशी मनातून एकरूप झालो होतो. त्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी मला मनस्वी त्रास झाला. चित्रपटातल्या माझ्या व्यक्तिरेखेच्या साकारण्याचं
बरंचसं श्रेय अजयसरांनाच जातं. त्यांनीच माझ्यातील सर्वोत्कृष्ट अभिनय बाहेर काढला. तापसी तसंच गुलशन यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभवही खूप उत्तम होता.
मी तापसीबरोबर पूर्वीही काम केलं होतं आणि आमच्यात कामापेक्षाही दुसरं नातं आहे. ती एक उत्कृष्ट अभिनेत्री असून आपल्या सहकलाकारांना ती नेहमीच मदत करते. ओटीटीवर यापूर्वी ब्लरला खूपच विधायक प्रतिसाद लाभला होता. आता अॅण्ड पिक्चर्स वाहिनीवर तो प्रसारित झाल्यावर तिथेही त्याला प्रेक्षकांकडून असाच प्रतिसाद मिळेल, अशी मी आशा करतो.”
वक्त से लडकर क्या गायत्री ढूँढ पाएगी किलर? येत्या शनिवारी रात्री 9.30 वाजता पाहा ‘ब्लर’चा जागतिक टीव्हीप्रीमिअर फक्त ‘अॅण्ड पिक्चर्स’ वाहिनीवर!