नंदुरबार : ग्रामविकास संस्थेच्या कला महाविद्यालय बामखेडे येथे दि. 27 फेब्रुवारी 2024 रोजी मराठी विभागात जागतिक मराठी दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, मराठी विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्राचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ बी.एन.गिरासे हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभाग प्रमुख आणि मराठी विभाग प्रमुख डॉ सी.एस.करंके यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रविंद्र पावरा यांनी केले.कार्यक्राच्या सुरुवातीला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
डॉ. सी. एस. करंके यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्याचा परिचय करून दिला.तसेच त्यांचे कार्य स्पष्ट करतांना मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्या मागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी मराठी विभागातील कु.पटेल तेजस्विनी मनिलाल, या विद्यार्थिनीने कुसुमाग्रजांची कवितेचे वाचन केले.तर कु.जोशी कल्याणी मधूकर या विद्यार्थिनीने वि.वा.शिरवाडकराच्या नाटकाचा परिचय करून दिला. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.बी. एन. गिरासे सर यांनी मराठी भाषेचे महत्त्व मराठी भाषेतील संत परंपरा शाहिरी परंपरा अशा विविध परंपरांचा आणि या जागतिकीकरणामध्ये मराठी भाषेचे महत्त्व कसे आहे या बाबींवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे आभार प्रकटन कु. अश्विनी माळी या विद्यार्थिनीने केले.या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. वाय. सी. गावित,महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. के. पी. पाटील त्याचप्रमाणे अर्थशास्त्र विभागाचे प्रा. ए. एम. गोसावी सर आणि महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.