29.8 C
New York
Sunday, Jul 6, 2025
Bharat Mirror Marathi
जळगाव सुरत

श्री मराठा पाटील समाज मंडळ सुरत प्रमुखपदी छोटू पाटील यांची निवड

सुरत ( प्रतिनिधि ) मराठा पाटील वाडी येथे आयोजित श्री मराठा पाटील समाज मंडळाच्या सर्वसाधारण सभेत श्री मराठा पाटील मंडळाचे अध्यक्ष वसंत श्रीधर पाटील यांनी प्रकृती आणि वयामुळे श्री मराठा पाटील मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

श्री मराठा पाटील समाज मंडळ सुरतच्या सामान्य सभेत मुळ जळगाव जिल्हा ता. अमळनेर गाव चोरवड रहिवासी व सुरतेत विविध पदावर विराजमान छोटू पाटील यांची आज सर्व संमतीने मराठा पाटील मंडळ सुरत गुजरातच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात नवीन कार्यकारिणीचे स्थापित करून समाजासाठी नवीन वाडी बनवण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

तसेच  बैठकीत पाटील समाजाच्या वाडीसाठी सुमारे 50 ते 60 लाखांची देणगी समाजाच्या नेत्यांनी जाहीर केली. छोटू पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली समाज एक नवी उंची गाठेल हीच सदिच्छा आणि छोटू पाटील यांना पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन.

Related posts

लिंबायत परिसरात स्वातंत्र्यसैनिक व लष्करी जवानांच्या कुटुंबीयांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन

BM Marathi

मुंबईतील जीतो अहिंसा रनमध्ये 500 दृष्टिहीन मुले सहभागी होणार 

BM Marathi

सुरत: चंद्रशेखर आझाद पुलावर चालत्या कारला आग लागली

BM Marathi

Leave a Comment