5.9 C
New York
Tuesday, Feb 4, 2025
Bharat Mirror Marathi
महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरासाठी च्या अंतरिम विकास आराखड्यास अंतिम मजुरी द्यावी – पराग अळवणी,आमदार

मुंबई दि. 17 : छत्रपती शिवाजी आंरराष्ट्रीय विमानतळ परिसरासाठी च्या अंतरिम विकास आराखड्यास अंतिम मजुरी द्यावी अशी मागणी विधानसभेत एमआरटीपी संबंधी विधेयका वर बोलताना आमदार पराग अळवणी यांनी केली. एमआरटीपी कायद्या अंतर्गत विकास आराखड्याचा मसुदा तयार करण्यासाठी नियोजन प्राधिकरणाना मुदतवाढ देण्याबाबत मांडलेल्या विधेयकावर बोलताना त्यांनी ही मागणी केली.

छत्रपती शिवाजी आंरराष्ट्रीय विमानतळ परिसरासाठी आरखडा तयार करताना कलम 30/31 अंतगत अंतिम आराखडा न करता कलम 32 अन्वये अंतरिम विकास आराखडा तयार करण्यात आला.हे करताना झोपडपट्टी ने व्याप्त असलेला सुमारे 205 एकर जमीन आराखड्यातून तात्पुरते बाहेर ठेवण्यात ( Excluded Portion ie EP ) आले. सदर झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचे कार्य मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट प्रा.ली. ( MIAL) ने करावे व त्यानंतर EP सकट अंतिम आराखडा तयार केला जाईल असे सांगण्यात आले होते.मात्र 10 वर्षे उलटून सुध्दा हे झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.वगळलेल्या भागा सकट आराखडा तयार झाला तर झोपडपट्टी पुर्विकासा बाबत एमएमआरडा ला निर्णय घेता येणार असल्याने त्वरित याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार पराग अळवणी यांनी केली.

प्रशासन स्वतःला पाहिजे तेथे एमआरटपी मध्ये बदल सुचवते मात्र लोकांचे प्रश्न व विकास सुकर होण्यासाठी सुद्धा सुयोग्य बदल व्हावा असे त्यांनी सांगितले.त्यामुळे नगर योजनेतील आवश्यक छोटे बदल करण्यासाठी कलम 91 मध्ये शिथिल करणे,अन्य विविध प्रस्ताव पारित करण्यासाठी सुद्धा कालमर्यादा ठरवावी अशी मागणी पराग अळवणी यांनी केली.

Related posts

रविवारी मुंबईकर अनुभवणार गोविंदांचा थरार

BM Marathi

डॉ. प्रतिक यांना संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेने (UNHRO) आंतरराष्ट्रीय शांतता दूत म्हणून नियुक्त केले आहे.

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

BM Marathi

Leave a Comment