13.6 C
New York
Friday, Apr 18, 2025
Bharat Mirror Marathi
गुजरात सुरत

श्री मराठा पाटील समाजाचा शस्त्र पूजन व स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न

सुरत ( प्रतिनिधी ) दरवर्षी प्रमाणे दसऱ्याच्या पवित्र सणानिमित्त श्री मराठा पाटील समाजाच्या वतीने पाटीलवाडी गुरुनगर उधना येथे श्री मराठा पाटील समाज मंडळाचे अध्यक्ष व भारतीय रेल्वेचे PSC सदस्य छोटू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शस्त्र पूजन व स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतीय परंपरेनुसार शस्त्रांचे पूजन करून सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमात मराठा पाटील समाजाचे अध्यक्ष छोटू पाटील, युथ फॉर गुजरातचे अध्यक्ष जिग्नेश पाटील, नगरसेविका रोहिणीबेन पाटील, नगरसेवक शरद पाटील, भूषण पाटील, शिक्षण समिती सदस्य संजय पाटील, माजी नगरसेवक डॉ.रवींद्र पाटील, विनोद पाटील, डॉ.डी.एम.वानखेडे , पाटील समाजाचे माजी अध्यक्ष वसंत पाटील, शिवाजी पाटील व नरेश पाटील, आर.डी.पाटील, जे.एन.पाटील, हिरालाल पाटील, प्रकाश खैरनार, राहुल पाटील, किरण पाटील, प्रवीण पाटील, सचिन पाटील, मुकेश पाटील, विनायक पाटील, आबा पाटील, भिकेश पाटील, मराठा पाटील समाजाचे कार्यकारिणी सदस्य, सर्व पदाधिकारी, समाजाचे नेते उपस्थित होते.

Related posts

स्वच्छता सर्वेक्षणः सूरतला पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी सात वर्षे लागली, नागरिकांच्या अभिप्रायामध्ये इंदोरपेक्षा जास्त गुण

BM Marathi

पोलिस आयुक्त अनुपम सिंग गेहलोत यांनी पदभार स्वीकारला

BM Marathi

शिक्षिका मनीषा कोष्टी यांचा ‘गुणवंत शिक्षिका’ पुरस्काराने गौरव

BM Marathi

Leave a Comment