13 C
New York
Thursday, Nov 21, 2024
Bharat Mirror Marathi
महाराष्ट्र व्यापार-उद्योग

युगांडा एअरलाइनकडून आठवड्यातून तीनदा एण्‍टेबे ते मुंबई विमानसेवेच्‍या लाँचसह भारतातील कार्यसंचालनांचा शुभारंभ

मुंबई, ३ ऑक्‍टोबर २०२३: युगांडा एअरलाइन्‍सने आज मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्‍ट्रीय विमानतळ आणि युगांडामधील एण्‍टेबे आंतरराष्‍ट्रीय विमानतळ यांना जोडणाऱ्या नवीन विमानसेवेच्‍या लाँचसह भारतातील कार्यसंचालनांच्‍या शुभारंभाची घोषणा केली. ही विमानसेवा ७ ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. दोन्‍ही शहरांमध्‍ये आठवड्यातून तीनदा ही विमानसेवा कार्यरत असेल आणि त्‍यांच्‍या एअरबस ए३३०-८०० निओ विमानामधून प्रवास करण्‍याची सुविधा दिली जाईल. ही विमानसेवा तीन क्‍लास कन्फिग्‍युरेशनमध्‍ये प्रवास करण्‍याची सुविधा देईल: बिझनेस (२० सीट्स), प्रिमिअम इकॉनॉमी (२८ सीट्स) आणि इकॉनॉमी (२१० सीट्स). ५० वर्षांमध्‍ये पहिल्‍यांदा ही उत्‍साहवर्धक विमानसेवा देण्‍यात येणार आहे, जेथे भारत व युगांडा नॉन-स्‍टॉप विमानसेवेच्‍या माध्‍यमातून कनेक्ट होतील.

ही विमानसेवा आफ्रिकन खंडाबाहेर युगांडा एअरलाइन्‍सच्‍या सेवेचा विस्‍तार करते आणि झपाट्याने विस्‍तारित होत असलेल्‍या नेटवर्कमध्‍ये सामील होते, जेथे प्रवाशांना दक्षिण, पश्चिम, मध्‍य व पूर्व आफ्रिकेपर्यंत सोईस्‍करपणे प्रवास करता येईल. या विमानप्रवासासाठी एकमार्गी जवळपास साडे-पाच तास लागतील, ज्‍यामधून प्रवाशांना व्‍यवसायाकरिता, कौटुंबिक ट्रिपकरिता किंवा पर्यटनाकरिता उत्तम व सोईस्‍कर विमानप्रवासाची सुविधा मिळेल. 

”आम्‍हाला आमच्‍या नेटवर्कमध्‍ये या नवीन विमानसेवेला सादर करताना आनंद होत आहे, ज्‍यामधून युगांडा एअरलाइन्‍स प्रवाशांसाठी ट्रॅव्‍हल पर्यायांमध्‍ये वाढ करत असल्‍याची खात्री मिळते. सोयीसुविधेव्‍यतिरिक्‍त आम्‍ही आशा करतो की, ही विमानसेवा विद्यमान व्‍यवसायामध्‍ये, तसेच शतकापासून असलेल्‍या भारत व युगांडामधील व्‍यावसायिक संबंधांमध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करेल,’ असे प्रमुख व्‍यावसायिक अधिकारी श्री. अॅडेडयो ओलावुयी म्‍हणाले. 

”२०१७ पासून मी मुंबई ते एण्‍टेबेपर्यंत थेट फ्लाइटचे स्‍वप्‍न पाहत होतो, ज्‍यामुळे दोन्‍ही देशांमधील व्‍यापार, वाणिज्‍य व पर्यटनाला चालना मिळते. माझे स्‍वप्‍न पूर्ण होत असल्‍याचे पाहून मला आनंद होत आहे,” असे युगांडाचे मा. कौन्‍सुल एच. ई. मधुसुदन अग्रवाल म्‍हणाले. 

युगांडामधून उद्घाटनीय फ्लाइट यूआर ४३० एण्‍टेबे येथून शनिवार ७ ऑक्‍टोबर रोजी उड्डाण घेईल आणि रिटर्न फ्लाइट यूआर ४३१ मुंबईमधून रविवार ८ ऑक्‍टोबर रोजी उड्डाण घेईल.

युगांडा एअरलाइन्ससाठी फ्लाइट वेळापत्रक:     

 

फ्लाइट क्र.  प्रस्‍थान विमानतळ  प्रस्‍थान वेळ (स्‍थानिक)  आगमन विमानतळ  आगमन वेळ (स्‍थानिक)  कार्यसंचालनाचे दिवस 
यूआर ४३०  एण्‍टेबे (ईबीबी)  रात्री ८.१५ वाजता  मुंबई (बीओएम)  सकाळी ५.५५ वाजता  सेामवार, बुधवार, शनिवार 
यूआर ४३१  मुंबई (बीओएम) सकाळी ७.५५ वाजता  एण्‍टेबे (ईबीबी) दुपारी १२.२५ वाजता  मंगळवार, गुरूवार, रविवार

युगांडामध्‍ये प्रवास करत राहण्‍याची इच्‍छा असलेल्‍या प्रवाशांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी विद्यमान नेटवर्कमध्‍ये उत्तम वेळापत्रक तयार करण्‍यात आले आहे. 

बुकिंग्‍ज सुरू आहेत आणि युगांडा एअरलाइन्‍स अॅपच्‍या माध्‍यमातून सोईस्‍करपणे बुकिंगची सुविधा देण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे प्रवाशी रिझर्व्‍हेशन्‍स करू शकतात, तिकिटांसाठी देय रक्‍कम भरू शकतात, प्रवासामध्‍ये बदल करू शकतात आणि बोर्डिंग पासेस् प्रिंट करू शकतात. हे अॅप गुगल प्‍ले व अॅप्‍पल आयस्‍टोअरवर उपलब्‍ध आहे. 

युगांडा एअरलाइन्‍स सध्‍या दुबई, जोहान्सबर्ग, बुजुम्बुरा, नैरोबी, मोम्बासा, झांझिबार, दार एस सलाम, किलिमांजारो, जुबा, किन्शासा आणि मोगादिशू या गंतव्‍यांपर्यंत विमानसेवा देते. लागोस, नायजेरियाकरिता विमानसेवा लवरकच सुरू होणार आहे. 

Related posts

MATTER AERA – भारतातील पहिली गियर इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच करताना ४०,००० प्री-बुकिंगसह भारताकडून पसंती

BM Marathi

मुंबई जिल्हा उपनगर फेडरेशन निवडणुकीत शिवसेनेचा भगवा, अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर, सचिवपदी रमेश प्रभू यांची नियुक्ती

BM Marathi

MATTER ने इलेक्ट्रिक मोटरबाइक AERA साठी विशेष प्री-बुक ऑफर जाहीर केली; प्री-बुकिंग १७ मे पासून सुरू

BM Marathi

Leave a Comment