13.6 C
New York
Friday, Apr 18, 2025
Bharat Mirror Marathi
नंदुरबार शिक्षा

बामखेडा महाविद्यालयातील चंद्रकांत साळुंखे या विद्यार्थ्यास सुवर्णपदक प्राप्त

शहादा :  बामखेडा येथील ग्राम विकास संस्थेच्या कला महाविद्यालयातील विद्यार्थी चंद्रकांत सुरेश साळुंखे यास एम.ए. इंग्रजी या वर्गात विद्यापीठ पातळीवर सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. चंद्रकांत साळुंखे यास एम. ए.इंग्रजी या वर्गात एकूण 1600 पैकी 1372 गुण म्हणजेच 85.75 टक्के गुण प्राप्त झाले असून एकूण सीजीपीए 9.63 प्राप्त झाला आहे.

चंद्रकांत साळुंखे हे हिंगणी,तालुका शहादा येथील  सुरेश बन्सीलाल साळुंखे यांचे पुत्र आहेत. सुरेश बन्सीलाल साळुंखे हे शेतकरी असून परिसरामध्ये टेन्टचा सुद्धा व्यवसाय करीत असतात. चंद्रकांत याचा भाऊ समाधान साळुंखे हा बेस्ट मुंबई येथे कंडक्टर या पदावर कार्यरत आहे. चंद्रकांतच्या मातोश्री सौ. सुनंदाबाई या घरकाम करतात. अशा प्रकारे शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी लाभलेल्या खेड्यातील एका विद्यार्थ्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विशेषतः इंग्रजी विषयामध्ये सुवर्णपदक प्राप्त करणे हे अत्यंत अभिमानास्पद आहे.ग्रामीण भागातील बामखेडासारख्या गावातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने विद्यापीठाचे प्राप्त केलेले सुवर्णपदक ही बाब विशेष आहे.

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील चंद्रकांत साळुंखे यांनी प्राप्त केलेल्या सुवर्णपदकाबद्दल ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष श्री पी. बी.पटेल,उपाध्यक्ष डॉ. के.एच. चौधरी,सचिव श्री बी .व्ही. चौधरी, प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील, सर्व सहकारी प्राध्यापक व प्राध्यापकेतर वर्ग आणि परिसरातील अनेक हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे. चंद्रकांत साळुंखेच्या यशाबद्दल व भावी वाटचालीबद्दल सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Related posts

बामखेडा कला महाविद्यालयात मधुमेह प्रतिबंधक उपचार शिबिराचे आयोजन

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा संपन्न

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

BM Marathi

Leave a Comment