20.2 C
New York
Monday, Jun 30, 2025
Bharat Mirror Marathi
धुळे शिक्षा

बामखेडा महाविद्यालयाचे रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबिर त-हाडी येथे संपन्न

शिरपुर ( प्रतिनिधी ) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व ग्रामविकास संस्थेचे कला महाविद्यालय बामखेडे त.त. यांच्या संयुक्त विद्यमाने रासेयो शिबिर त-हाडी येथे दिनांक २ फेब्रुवारी २०२४ ते ८ फेब्रुवारी२०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ अतिशय उत्साहात पार पडला.

या सात दिवशीय शिबिरामध्ये संपूर्ण गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच गावांमधील ई- प्लास्टिक कचरा साफ करून त्याची योग्य विल्हेवाट लावली, या काळात संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. के.एच. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गावात जनावरांमधील लाळखुरगट लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याचा लाभ गावकऱ्यांनी घेतला तसेच पशू संवर्धनाच्या विविध योजनांची माहिती या उपक्रमातून दिली .या काळात राष्ट्रीय सेवा योजना एक संस्कार,, दशरथ मांझी – द.माऊंटन मॅन, ई , कचरा, लोकशाही नेतृत्वाचे महत्त्व, ऊर्जा बचत काळाची गरज,. खान्देशातील स्वातंत्र्य सैनिक , योगाचे महत्त्व इत्यादी विषयांवर या शिबिरामध्ये विविध तज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

याच काळात शहादा विभागीय समन्वयक डॉ. एम. एस. पाटील यांनी शिबिराला भेट दिली आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुकही केले. त्यात त्यांनी म्हटले की विद्यापीठात जनावरांच्या आजारांवर शिबिर घेणारे पहिले महाविद्यालय आहे असा उल्लेख केला .

८ फेब्रुवारी रोजी या शिबिराचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच श्री. सुदाम भलकार , प्रमुख उपस्थिती ग्रामविकास संस्थेचे सचिव मा.श्री बी.व्हि.चौधरी त-हाडी गावाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच मा. जयश्री धनगर उपसरपंच मा.उज्जनबाई अहिरे , तंटामुक्त समिती अध्यक्ष मा.तुळशीराम भामरे मल्हार सेना धुळे जिल्हा अध्यक्ष मा.सुनील धनगर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. योगेश पाकळे पोलिस पाटील मा. प्रतापसिंह गिरासे माजी उपसरपंच अशोक सोनवणे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी चेअरमन संजय जाधव,समारोप कार्यक्रमासाठी इत्यादी प्रमुख पाहुणे लाभले होते, या प्रसंगी विविध स्वयंसेवकांनी त्यांना आलेले अनुभव मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केले. यामध्ये कु.वैशाली पारधी .कु.अश्वीनी कोळी, राजकुमार चौधरी इत्यादी स्वयंसेवकांनी आलेल्या सात दिवसांमध्ये हृदयस्पर्शी अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

तुळशीराम भाईदास पाटील यांनी स्वयंसेवकांना आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता येणाऱ्या समस्यांना तोंड द्यायचे आणि यामधून यशस्वी कसे व्हायचे याविषयी मार्गदर्शन केले, नवीन पिढी जास्तीत जास्त मोबाईलच्या आहारी कशी जात आहे व मोबाईल चे दुष्परिणाम कसे होत आहेत यातून बाहेर पडण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले मा.सुदाम भलकार यांनी विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी जास्तीत जास्त परिश्रम घेणे,मेहनत, जिद्द चिकाट प्रामाणिकपणा, आपल्या अंगी बाळगणे आवश्यक आहे असे मत त्यांनी स्वयंसेकासमोर मांडले ,संस्थेचे सचिव श्री बी. व्ही.चौधरी यानी विद्यार्थ्याचे आणि गावकऱ्यांचे कौतुक केले.

तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी,एन गिरासे यांनी आपले मनोगतात विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या अनुभवाची शिदोरी पुढील जीवनरूपी प्रवासात नक्कीच उपयोगी पडेल असा आशावाद व्यक्त केला , या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ए.एम.गोसावी यांनी केले. आणि कार्यक्रमाचे प्रस्तावीक व सातदिवसाचा लेखाजोखा सहाय्यक कार्यक्रम आधिकारी डॉ. वाय.सी.गावीत यांनी मांडला. तर आभार डॉ. सी.एस.करंके यांनी मानले . याप्रसंगी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.डी.बी.वाघ व महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ के .पी.पाटील तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.तसेच गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी व जि.प.मराठी शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचे सहकारी , विविध वृत्तपत्रांचे पत्रकार बंधू , महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर बंधू उपस्थित होते.

Related posts

बामखेडा महाविद्यालयाचे रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबिर त-हाडी येथे संपन्न

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील यांची सीनेट सदस्य पदी निवड

BM Marathi

आयर्लंड सरकारने आयरिश संस्‍थांना आणले एकत्र; मुंबईमध्‍ये वैयक्तिक एज्‍युकेशन फेअरचा शुभारंभ

BM Marathi

Leave a Comment