0.7 C
New York
Thursday, Feb 6, 2025
Bharat Mirror Marathi
नंदुरबार महाराष्ट्र शिक्षा

बामखेडा महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

नंदुरबार: ग्रामविकास संस्थेच्या कला महाविद्यालय बामखेडे त.त. येथे मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात आला. त्यात विद्यार्थ्यांना कोश साहित्यचा परिचय करण्यात आला. तसेच ते कसे बघावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. त्याच प्रमाणे भाषेच्या विविध कौशल्यांचा परिचय करून दिला.त्यानंतर ग्रंथ परीक्षण कसे करावे ग्रंथ परीक्षण करताना कोणकोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावे त्यावर कोणकोणत्या मर्यादा येतात यावर प्रकाश टाकला.

मराठीतल्या विविध बोली परिचय आणि मराठी भाषा कशी टिकून आहे या विषयी मार्गदर्शन केले.  29 जानेवारी रोजी प्रभारी प्राचार्य डॉ. बी.एन. गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली पंधरवड्याची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.सी. एस. करंके यांनी केले. या कार्यक्रमात मराठी विभागातील तेजस्विनी पाटील , फरिना अन्सारी या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाप्रसंगी मराठी भाषा संवर्धन करण्याची गरज काय आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणकोणते प्रयत्न करावे यावर प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एन. गिरासे यांनी प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे आभार प्रकटन मराठी विभागातील प्रा.आर.एन. पावरा यांनी केले.

Related posts

साईबाबा कला वरिष्ठ महाविद्यालयाचे ग्राम स्वच्छता अभियान

BM Marathi

लक्कडकोट तालुका शहादा येथे राष्ट्रीय हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन दिमाखात संपन्न

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात बांबु मिशन ही विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा संपन्न

BM Marathi

Leave a Comment