कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व साईबाबा कला वरिष्ठ महाविद्यालय म्हसावद यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन करण्यात आले
शहादा : रविवार दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी दत्तक गाव लकडकोट तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे सकाळी ठीक दहा वाजता हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले होते त्यात लक्कडकोट गावाच्या प्रथम नागरिक व सरपंच सीताबाई दारासिंग ठाकरे तसेच माजी सैनिक अब्बास यासिंग भिल यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करून दीपप्रजलन करून शिबिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम संपन्न झाला, उपसरपंच पोलीस पाटील तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच युवा कवी संतोष पावरा तसेच युवा मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
उद्घाटनासाठी श्री साईबाबा भक्त मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब विठ्ठल हिरजी चौधरी उपाध्यक्ष अण्णासाहेब धारुभाई सदाशिव पाटील, संस्थेचे सचिव आप्पासाहेब गणेश नरोत्तम पाटील संस्थेचे संचालक अण्णासाहेब नथू लीमजी पाटील तसेच संचालक प्रसन्न कुमार बंब, धनाला ओंकार सूर्यवंशी तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनासाठी आवर्जून उपस्थित होते. सुरुवातीला मा. सैनिक अब्बास यास सिंग भिल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. हिवाळी श्रम संस्काराच्या शिबिरासाठी विभागीय समन्वयक राजेंद्र मोरे सर उपस्थित राहिले.
त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका संगिता पटेल तर आभार प्रदर्शन प्राध्यापक बनसोडे यांनी केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मनोज पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना सात दिवशीय श्रमसंस्कार शिबिराविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब विठ्ठल हिरजी चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी सात दिवस अत्यंत शिस्तीने व प्रामाणिकपणे श्रम करून आपल्या विद्यापीठाचे तसेच महाविद्यालयाचे नावलौकिक होईल असे वागावे अशा सूचना केल्या.
कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक अशोक गिरासे यांनी विद्यार्थ्यांना सात दिवसांचे नियोजन करून ग्रुप वाईज काम वाटून दिले त्यानंतर दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी नाईक कॉलेज शहादा येथील हिंदी विषयाचे प्राध्यापक अशोक तायडे सर यांनी पहिले पुष्पगुले गुंफले.