9.9 C
New York
Tuesday, Nov 19, 2024
Bharat Mirror Marathi
नंदुरबार

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 विद्यार्थी हिताचे – प्राचार्य डॉ. खैरनार

शहादा: ग्रामविकास संस्था संचलित कला महाविद्यालय बामखेडे त.त. येथे विद्यापीठ स्तरीय प्रथम वर्ष कला मराठी पुनर्रचना अभ्यासक्रम कार्यशाळा संपन्न झाली.या कार्यशाळे साठी धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील मराठीचे विषयाचे 70 प्राध्यापक उपस्थित होते.

या कार्यशाळा कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामविकास संस्थेचे सचिव मा. श्री बी. व्ही. चौधरी उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून मानव्य विद्या शाखा अधिष्ठाता प्राचार्य डॉ.ए.पी. खैरनार होते,तर प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ कबचौ उमवि जळगाव डॉ. के. एन. सोनवणे तसेच ग्राम विकास संस्थेचे उपाध्यक्ष मा. डॉ. के. एच. चौधरी उपस्थित होते ,तसेच माजी प्राचार्य मा. डॉ. एस. पी. पाटील उपस्थित होते.

उद्घाटनपर पहिल्या सत्राचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. सी. एस. करंके यांनी केले. उद्घाटनपर मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ.ए.पी.खैरनार यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 20 20 संदर्भातील सहा व्हर्टीकल्स मेजर विथ मायनर, ओपन इलेक्टिव्हज, व्हॅल्यू एज्युकेशन, स्किल एज्युकेशन, भारतीय शिक्षण प्रणाली, कोकरीक्यूलम ॲक्टिव्हिटीज या वैशिष्ट्यांचा संयुक्त विचार मांडून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी केंद्रित आहे असे पटवून दिले. हे धोरण विद्यार्थी जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणणारे आहे.

अनुभूतीतून शिक्षण तसेच मातृभाषेतून शिक्षण, क्रेडिट ट्रान्सफर, मल्टिपल एंट्री अँड मल्टिपल एक्झिट, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास, शिक्षणातील लवचिकता, इंटर इन्स्टिट्यूट मोबिलिटी , आदी बाबींचा उल्लेख आपल्या उद्घाटनपर भाषणात मांडले. विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, मूल्यवृद्धी करणारे शिक्षण, कौशल्याधिष्ठित शिक्षण, रोजगाराभिमुख शिक्षण हे मुख्य आधारस्तंभ न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या आहेत असे स्पष्ट केले.या आधारभूत गोष्टींचा विचार करून प्रथम वर्षाच्या मराठीचा अभ्यासक्रम आपल्या विद्यापीठाचा दर्जेदार होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

या कार्यशाळा कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव मा.श्री बी.व्ही.चौधरी यांनी आपल्या मनोगत आतून संस्थेच्या स्थापनेच्या इतिहासावर प्रकाश टाकला आणि आपण आजपर्यंत जे नवनवीन शैक्षणिक धोरणे आली आणि त्यात कोणकोणते बदल झालेत याविषयी मार्गदर्शन केले आणि विद्यार्थी कल्याण कसं होईल ही या प्रसंगी तळमळ व्यक्त केली तसेच आलेल्या प्राध्यापकांचे शब्द सुमनांनी स्वागत केले. या सत्राचे आभार प्रकटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मा.डॉ.बी.एन. गिरासे यांनी केले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात अध्यक्ष म्हणून डॉ.आर. डी. पाटील यांनी कामकाज पाहिले यावेळी दहा प्राध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त केली. त्यात अभ्यासक्रमाचे काठीन्य पातळीवर भर देण्यात आला.तसेच अभ्यासक्रमात कोणता बदल, कोणती संदर्भ पुस्तके कथा कादंबरी आणि नाटक इ. वाड्मयीन प्रकारा विषयी आपापली मनोगते व्यक्त या प्रसंगी केली.

भोजनानंतर दुसऱ्या सत्रात डॉ. फुला एम. बागुल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले त्याप्रसंगी नऊ प्राध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात प्रश्नपत्रिकेचे स्वरूप नवीन आव्हानांना सामोरे जाताना कोणते बदल आपल्या मराठी अभ्यासक्रमात यायला पाहिजे जेणेकरून विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये टिकतील यावर प्रकाश टाकण्यात आला. दोन्ही सत्राच्या समारोप प्रसंगी अभ्यासक्रमाचे अध्यक्ष डॉ. के.एन. सोनवणे यांनी प्रथम वर्ष कला मराठी पुनर्रचित अभ्यासक्रमाचा आराखडा कसा आहे तो जाहीर केला आणि त्याच्यात कसे बदल करण्यात येतील यावर प्रकाश टाकला.

या समारोप याप्रसंगी चार प्राध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त केली त्यात कार्यशाळा कशी यशस्वी झाली याबद्दल प्राध्यापकांनी संस्थेचे आणि मराठी विभागाचे आभार मानले या कार्यशाळेचे आभार प्रकटन मराठी विभाग प्रमुख डॉ. सी. एस. करंके यांनी मानले.

Related posts

बामखेडा कला महाविद्यालयात मधुमेह प्रतिबंधक उपचार शिबिराचे आयोजन

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

BM Marathi

कला महाविद्यालयात मधुमेह प्रतिबंधक उपचार शिबिर संपन्न

BM Marathi

Leave a Comment