11.3 C
New York
Thursday, Nov 21, 2024
Bharat Mirror Marathi
नंदुरबार

साईबाबा कला वरिष्ठ महाविद्यालयाचे ग्राम स्वच्छता अभियान

म्हसावद: श्री साई बाबा भक्त मंडळ संचलित कला वरिष्ठ महाविद्यालय म्हसावद तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले सकाळी ठीक 9:00 वाजता कला वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात महाविद्यालयाचे एन एस एस विभागाचे सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनी यांनी एकत्रित येऊन गावातून ग्राम स्वच्छता अभियान रॅली काढून ग्राम स्वच्छता अभियानाचे नारे देऊन जनजागृती केली .

तदनंतर ग्रामीण आरोग्य रुग्णालय म्हसावद याच्या आवारातील संपूर्ण पडलेला घनकचरा, प्लास्टिक पिशव्या तसेच काडीकचरा त्यांचे संकलन करून जमा करण्यात आले, त्यावेळेस ग्रामीण आरोग्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ए. आर. शेख , डॉक्टर अशोक गोसावी, डॉक्टर नाईक, आयसीटीसी विभागाचे भुषण पाटील, अर्जुन कुमार, प्रशांत साळवे, रवींद्र गिरासे, महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज पाटील सर, प्रा. बनसोडे, यांनीही स्वच्छता अभियानात भाग घेऊन स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला.

कार्यक्रम यशस्वीेसाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. संगिता पटेल, प्रा.गुंजाळ प्रा.पवार प्रा.कविता भिलावे व सर्व महाविद्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. अप्पासाहेब विठ्ठल चौधरी , उपाध्यक्ष अन्नासो धरुभाई पाटील, सचिव अप्पासो गणेशभाई पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले

Related posts

बामखेडा महाविद्यालयात विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा संपन्न

BM Marathi

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 विद्यार्थी हिताचे – प्राचार्य डॉ. खैरनार

BM Marathi

बामखेडा कला महाविद्यालयात मधुमेह प्रतिबंधक उपचार शिबिराचे आयोजन

BM Marathi

Leave a Comment