12.9 C
New York
Monday, Mar 17, 2025
Bharat Mirror Marathi
महाराष्ट्र

बामखेडा महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

शहादा – बामखेडा येथील ग्रामविकास संस्थेच्या कला महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सारंखेडा पोलीस स्टेशन, महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थिनी युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी सारंखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. राजेश शिरसाठ साहेब यांच्या शुभहस्ते वृक्षारोपन संपन्न झाले. त्याचप्रमाणे उपस्थित असलेल्या विद्यार्थिनी यांनी सुद्धा वृक्षारोपन करून वृक्षांना पाणी टाकले व वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेऊन जबाबदारी उचलली.

याप्रसंगी मा.राजेश शिरसाठ यांनी शासनाच्या खास उपक्रमानुसार व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परिसरामध्ये विविध ठिकाणी सारंखेडा पोलीस स्टेशनच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न होत आहे असे सांगितले.सदर वृक्ष लागवड नंतर त्यांचे संगोपनही करावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

महाविद्यलय परिसरात विविध वृक्ष लावणे सुलभ व्हावे म्हणून काही रोपंही त्यांनी दिली. याप्रसंगी प्राचार्य डॉ.एस. पी. पाटील आणि सर्व सहकारी प्राध्यापक व प्राध्यापकेतर वर्ग उपस्थित होते.

Related posts

माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

BM Marathi

डॉ. प्रतिक यांना संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेने (UNHRO) आंतरराष्ट्रीय शांतता दूत म्हणून नियुक्त केले आहे.

BM Marathi

Leave a Comment