Bharat Mirror Marathi
शिक्षा

बामखेडा महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रम उत्साहात

शहादा ( प्रतिनिधी ) ग्राम विकास संस्था संचलित कला महाविद्यालय बामखेडा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी एन गिरासे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्याच्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सी एस करंके यांनी केले.

प्रास्ताविकात त्यांनी राष्ट्रीय युवक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले .त्याबरोबरच त्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ या महान विभूतींचा परिचय करून दिला. त्याच्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉ.वाय सी गावित यांनी आपल्या भाषणात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचे जीवन चरित्र चित्रण केले .एवढेच नव्हे तर देशाच्या विकासात युवकांचे योगदान या विषयावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बी एन गिरासे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना”उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका”असा संदेश दिला .प्रस्तुत कार्यक्रमात निवडक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन नियोजन एन एस एस कार्यक्रमाधिकारी डॉ. वाय सी गावित यांनी केले.

सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.सी एस करंके यांनी केले. आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. डी बी वाघ यांनी केले.

Related posts

कला महाविद्यालयत राष्ट्रीय युवक दिन आणि राजमाता जिजाऊ जयंती साजरी

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात बिरसा मुंडा जयंती व महाबँक योजना उद्बोधन संपन्न

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयातील चंद्रकांत साळुंखे या विद्यार्थ्यास सुवर्णपदक प्राप्त

BM Marathi

Leave a Comment