13.6 C
New York
Friday, Apr 18, 2025
Bharat Mirror Marathi
नंदुरबार शिक्षा

बामखेडा महाविद्यालयात विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा संपन्न

शहादा : ग्रामविकास संस्थेच्या कला महाविद्यालय बामखेडे येथे दिनांक 14 फेब्रुवारी 2023 मंगळवार रोजी” शिक्षणाचे महत्त्व” या विषयावर विद्यापीठ स्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते‌.कार्यशाळेचे उद्घाटन त-हाडी येथील माजी सरपंच आणि प्रियदर्शनी सूतगिरणी शिरपूरचे संचालक मा. बापूसाहेब सुदाम नथ्थू भलकार यांच्या हस्ते झाले.त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनातून शिकल्यामुळे केवळ एका व्यक्तीचा विकास होत नसून त्या कुटुंबाचा विकास होतो हे विविध उदाहरणांनी पटवून दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मा. पी.बी. पटेल यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद करतांना ग्रामविकास संस्थेचा हेतू काय होता, त्याची फलश्रुती काय झाली यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष मा.डॉ. के.एच. चौधरी तसेच संस्थेचे सचिव मा.बी.व्ही. चौधरी उपस्थित होते.

या कार्यशाळेत एच. आर. पटेल महाविद्यालय शिरपूर येथील डॉ. गजानन पाटील, डॉ. राहुल सनेर साधन व्यक्ती म्हणून कामकाज पाहिले.त्यात पहिल्या सत्रात डॉ.सनेर यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद करतांना, आजचा विद्यार्थी शिक्षण फक्त नोकरी डोळ्यासमोर ठेवून घेतो.त्याऐवजी काही सुसंस्कार प्राप्त होऊन समाजाचा विकास होईल हा विशाल दृष्टिकोन ठेवला तर राष्ट्राचा विकास होईल हे विविध प्रसंग सादर करून मार्गदर्शन केले .

दुसऱ्या सत्रात डॉ.गजानन पाटील यांनी आजचे शैक्षणिक धोरण भविष्यात विद्यार्थ्यांना किती महत्वाचे आहे हे स्पष्ट केले. त्यांनी विविध ज्ञानशाखांचा परिचय करून दिला. तसेच प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ.एस.पी. पाटील यांनी शिक्षणाचे महत्त्वपूर्ण पैलू विशद केले.आपली वैदिक व पारंपरिक शिक्षण प्रणालीचा आढावा घेतला. आजच्या काळात नवीन शिक्षण प्रणाली कशी आहे याविषयी विविध उदा.दिली. या कार्यशाळेत ११० विद्यार्थी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.बी.एन.गिरासे यांनी केले.पहिल्या उद्घाटन सत्राचे आभार प्रकटन प्राध्यापक एम. एस. निकुंभे यांनी केले दुसऱ्या सत्राचे आभार प्रगटन इतिहास विभाग प्रमुख आणि कार्यशाळा समन्वय डॉ.वाय.सी.गावीत यांनी मानले .

Related posts

बामखेडा महाविद्यालयाचे रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबिर त-हाडी येथे संपन्न

BM Marathi

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रॉकवेल ऑटोमेशन STEM शिक्षण आणि अक्षय उर्जेला प्रोत्साहन

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन सप्ताहाची सांगता

BM Marathi

Leave a Comment