औरंगाबाद – महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांच्या संकल्पनेतून साकारलेली चेतना सायकल रॅली ही बँकेच्या १३ व्या वर्धापन दिन तसेच स्वातंत्राचा अमृत महोत्सव निमित्ताने २० जुलै ते ३१ जुलै २०२२ या दरम्यान मराठवाड्यातील ३० गावातून व सर्व जिल्ह्यातून “वित्तीय समावेशन व आर्थिक साक्षरता अभियान ” राबवीत आहे . या अभियानचे आयोजन महाराष्ट्र ग्रामीण बँक व नाबार्ड मार्फत केले आहे.
चवथ्या दिवशी सायकल स्वारांनी कुंभार पिंपळगाव येथून टाकरवन मार्गे माजलगाव पर्यंत मार्गक्रमण केले. नेहमी प्रमाणे आजही भव्य मेळावे घेण्यात आले. सायकलस्वार पावसाळ्यातील अवघड वाट अतिशय उत्साहाने पार करत आहेत. सायकल रॅली मध्ये बँकेचे अध्यक्ष , मुख्य सरव्यवस्थापक , सर व्यवस्थापक , मुख्य व्यवस्थापक , क्षेत्रीय व्यवस्थापक यासह अधिकारी सहभागी झालेले आहेत .
महाराष्ट्र ग्रामीण बँक पीक कर्ज वाटपात अग्रेसर
महाराष्ट्र ग्रामीण बँकेने या खरीप हंगामात आज पर्यंत 213499 शेतकरी बांधवाना रु 1799 कोटीचे पिक कर्ज किसान क्रेडीट कार्ड योजने अंतर्गत वाटप केले आहेत . मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. शेतकर्यांची बँक म्हणुन बँकेची ही कामगिरी उल्लेखनीय आहे.
तसेच थकीत पिक कर्ज सवलतीत परतफेड व पुन्हा नवीन पिक कर्ज अशी अभिनव “ महाग्रमीण बळीराजा तारणहार योजना” बँके मार्फत राबविण्यात येत आहे.
बचत गटांना कर्ज वाटप
बचत गटांना कर्ज वाटप करण्यात देखील बँक आघाडीवर आहे. आतापर्यंत 2564 बचत गटांना 39 कोटींचे कर्ज बँक मार्फत वाटप करण्यात आले आहे. या बचत गटांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनवून त्यांच्या दैनंदिन जीवनात भरघोस बदल घडविण्याचा बँकेचा मानस आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेची अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत एस फॉर एस कंपनी सोबत उल्लेखनीय कामगिरी
सायन्स फॉर सोसायटी टेक्नो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही एक अन्न प्रक्रिया कंपनी आहे. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने सदरील कंपनी सोबत टायअप करून आपल्या करमाड शाखेतर्फे एकूण 327 सुक्ष्म उद्योगांना 2.61 कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. सदरील सूक्ष्म उद्योगांमुळे ग्रामीण भागातील 327 कुटुंबांना कायमस्वरूपी उदरनिर्वाहाचे साधन मिळाले आहे.
हे उद्योग बॅंकेने PMFME अंतर्गत वाटप केले असल्याने 2021-22 मध्ये, महाराष्ट्र ग्रामीण बँके मुळे, औरंगाबाद जिल्ह्याला अन्न प्रक्रिया PMFME मध्ये देशात पहिला क्रमांक मिळालेला आहे.