औरंगाबाद – महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या 13 वा वर्धापनदिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने सुरू असलेल्या 550km चेतना सायकल रॅली ने तिसर्या दिवसाला 45 km चा पल्ला गाठत आतापर्यंत 150 km अंतर पार केले आहे.
तिसर्या दिवसाच्या रॅली ची सुरवात जालना जिल्ह्य़ातील अंबड येथून झाली. रॅली एक एक दिवस पुढे जात असताना सर्वांच्या उत्साहात अधिकाधिक भर पडत आहे. प्रवासादरम्यान मत्स्योदरी विद्यालय हादगाव येथे वित्तीय साक्षरता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ज्यात बँकेचे मुख्य व्यवस्थापक .संतोष प्रभावती सर व सहकाऱ्यांनी लघुनाट्य सादर करून शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल पेमेंट चे फायदे समजाऊन दिले.
तसेच या प्रसंगी अध्यक्ष मिलिंद घारड यांनी बँकेच्या वतीने शालेय साहित्य खरेदीसाठी रुपये १०,०००/- ची देणगी शालेय समिती कडे सुपूर्त करण्यात आली.पुढील प्रवासात कुंभार पिंपळगाव येथे देखील मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. बँकेचे वरीष्ठ अधिकारी थेट आपल्या दारी भेटीस आल्याने ग्राहकांना खूप समाधान वाटत आहे.
तिसर्या दिवस अखेर चेतना सायकल रॅलीचे कुंभार पिंपळगाव येथे आपला थांबा घेतला. चेतना सायकल रॅली रोज जवळ जवळ 45 km चा पल्ला गाठत अतिशय गतिमान पद्धतीने अंतर पार करत आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या चेतना सायकल रॅलीत स्वतः माननीय अध्यक्ष मिलिंद घारड आघाडीवर असून बँकेचे सरव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, शाखाव्यवस्थापक व अधिकारी यांनी सहभाग घेतला आहे.