13.6 C
New York
Friday, Apr 18, 2025
Bharat Mirror Marathi
नंदुरबार

बामखेडा महाविद्यालयात कथाकथन व हर घर तिरंगा जाणीव जागृती कार्यक्रम संपन्न

ग्रामविकास संस्थेचे कला महाविद्यालय बामखेडा व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात सकाळच्या सत्रामध्ये क्रांतिकारकांच्या कथाकथन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील यांनी राजा तिरतसिंह यांची गोष्ट सांगून इंग्रजांनी अनेक राज्य व संस्थाने कशी ताब्यात मिळविली याबद्दल विवेचन केले.

त्यानंतर कु.मयुरी हिरे हिने क्रांतिकारक अर्जुनसिंह, कु.यामिनी चव्हाण हिने रामप्रसाद बिस्मिल्ला खान व इतिहास विभागाचे प्रा. एम.एस. निकुंभे यांनी भगतसिंह या क्रांतिकारकांच्या जीवनातील कथा उपस्थितांसमोर मांडल्या. या कथाकथनामुळे स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारकांचे योगदान व प्राप्त स्वातंत्र्याचे महत्व व देशप्रेम यासंदर्भात विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना मार्गदर्शन मिळाले.

याप्रसंगी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक  रामोळेआप्पा सुद्धा उपस्थित होते. दुपारच्या सत्रामध्ये सारंगखेडा येथील पोलीस स्टेशन व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पोलीस निरीक्षक माननीय राजेशजी शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली गावातील कोळीवाडा परिसरामध्ये ‘हर घर तिरंगा’ संदर्भातील जाणीव जागृतीच्या कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी इतिहास विभागाचे प्रा. एम. एस. निकुंभे यांनी भारताचा तिरंगी ध्वज हा कसा लावावा, ध्वजसंहिता यासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अध्यक्ष समारोपात माननीय राजेशजी शिरसाठ यांनी भारतीय तिरंगा झेंड्याचे महत्त्व आणि प्रत्येकाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात घ्यावयाची काळजी यावर सविस्तरपणे मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रातील जाणीव जागृती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकटन इतिहास विभागप्रमुख डॉ. वाय सी.गावित यांनी केले. सर्वांनी झेंड्याचे पावित्र्य राखले जाईल असा मनोदय व्यक्त केला व कार्यक्रम संपन्न झाला. हर घर तिरंगा संदर्भातील जाणीव जागृतीचा कार्यक्रम प्रा.एम. एस. निकुंभे यांनी ग्रामपंचायत बामखेडा येथे ग्रामसभेतही केला.

तसेच महिला बचत गटाच्या सभेत उपस्थित असलेल्या सर्व महिलांच्या समोर सुद्धा हर घर तिरंगा चे उदबोधन केले. सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना महाविद्यालयातील एन.एस.एस विभाग, विद्यार्थी विकास विभाग तसेच युवती सभा विभाग यांचे सहकार्य लाभले.

Related posts

बामखेडा कला महाविद्यालयात मधुमेह प्रतिबंधक उपचार शिबिराचे आयोजन

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात बिरसा मुंडा जयंती व महाबँक योजना उद्बोधन संपन्न

BM Marathi

कला महाविद्यालयत राष्ट्रीय युवक दिन आणि राजमाता जिजाऊ जयंती साजरी

BM Marathi

Leave a Comment