औरंगाबाद – अध्यक्ष मिलिंद घारड यांच्या कल्पकतेतून २० जुलै ते ३१ जुलै २०२२ या दरम्यान मराठवाड्यातील ३० गावातून व सर्व जिल्ह्यातून “वित्तीय समावेशन व आर्थिक साक्षरता अभियान ” ५५० कि मी सायकल रॅली बँकेच्या १३ व्या वर्धापन दिन तसेच स्वातंत्राचा अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित करण्यात आली असून या अभियानचे आयोजन महाराष्ट्र ग्रामीण बँक व नाबार्ड मार्फत केले आहे.
रॅलीच्या दुसर्या दिवसाची सुरवात बदनापुर पासून सुरू झाली व शेलगाव, गोलापांगरी मार्गे 51km अंतरावर जालना जिल्ह्यातील अंबड येथे मुक्काम करण्यात आला. यावेळीही प्रत्येक शाखेवर ढोल ताशांच्या जल्लोषात चेतना सायकल रॅलीचे स्वागत होताना पाहण्यात आले. ग्रामस्थांन कडून रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वारकरी समाजाची परंपरा राखत वित्तीय साक्षरतेच्या या दिंडीत फुगडी देखील खेळण्यात आली. स्वतः अध्यक्ष साहेबांचा सहभाग हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
शेलगाव, गोलापांगरी व अंबड येथे भव्य मेळावे घेण्यात आले ज्यात अध्यक्ष मिलिंद घारड साहेबानी वित्तीय साक्षरता, डिजिटल पेमेंट तसेच कर्जाची नियमित परतफेड व त्याचे लाभ अश्या विविध विषयांवर बहुमूल्य अशे मार्गदर्शन केले. मठपिंपळगाव येथे बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्री. संतोष प्रभावती सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी लघुनाट्य सादर करून शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल पेमेंट चे फायदे समजवून दिले. तसेच काही ठिकाणी वृक्षवाटप देखील करण्यात आले. यातून बँकेची ग्रामीण भागातील लोकांसोबत जोडलेली नाळ अजून घट्ट होत आहे.
या सायकल रॅलीचे अजून एक वैशिष्ट्य अशे की 20 ते 65 या वयोगटातील कर्मचारी अतिशय उत्साहाने सहभागी झालेले असून 550km प्रवासाचे आव्हान अतिशय शिताफीने पेलत आहेत. माननीय अध्यक्ष श्री. घारड सर यात आघाडीवर आहेत. त्यांच्या सोबत सरव्यवस्थापक ,मुख्य व्यवस्थापक, अधिकारी व ग्राहक देखील सामील झाले आहेत. अध्यक्ष साहेबांच्या दमदार नेतृत्वाखाली चेतना सायकल रॅलीचा उद्देश्य सफल होताना दिसत आहे.