“गुंतवणुकीबाबत तळागाळापर्यंत जनजागृती करणे ही काळाची गरज” – सी ई ओ स्वरूप मोहंती
पुणे: साप्ताहिक समृध्द व्यापार संपादित ” गुंतवणुकीतील संधी ” या राज्यस्तरीय दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन भांडारकर रोड पुणे येथे मिरे ॲसेट इंवेस्टमेंट मॅनेजरस् इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे आशिया खंडाचे सी ई ओ स्वरूप मोहंती यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अविनाश पाटणकर, निलेश करकरे, प्रा. उत्तमराव हुंडेकर, भूषण महाजन, सी ए डॉ. दिलीप सातभाई, समृध्द व्यापारचे मुख्य संपादक दत्तात्रय जी परळकर, अतिथी संपादक संदीप भूशेट्टी, हर्षवर्धन भुसारी, धवल चित्रे, राजेंद्र सताळकर, अर्थपूर्ण मासिकाचे संपादक यमाजी मालकर, माधव गणपुले, अमित बिवलकर, निशांत परळकर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
श्रोत्यांना संबोधित करताना म्हणाले की, गुंतवणुकीबाबत तळागाळापर्यंत जनजागृती करणे ही काळाची गरज आहे आणि ती गरज पूर्ण करण्यात समृध्द व्यापार सक्षम आहे. या कार्यक्रमांत दिवाळी विशेषांक फिजिकल व डिजिटल स्वरूपात पण प्रकाशित करण्यात आला. हा अंक विक्रीसाठी उपलब्ध आहे. ॲड प्रफल्ल पोतदार व आबा शिरवळकर यांनी अंक खरेदी करून खरेदीचा शुभारंभ केला. या कार्यक्रमासाठी स्टे फिचर्डचे क्रिएटिव्ह डायरेक्टर तथा लेखक व जाहिरात प्रसिद्धी तज्ञ प्रचेतन पोतदार, आदिस प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक संचालक अक्षय कांबळे, सुप्रसिद्ध बिल्डर आबा शिरवळकर, सन & ओशियनचे संचालक राजकुमार धूरगुडे, कॉर्पोरेट क्षेत्रातील ॲड सुनील चीताडे, दिनेश पडीले, गोविंद हांडे, पत्रकार माधव दिवाण, दिनेश कोठावडे, भुषण वाणी, पिफा प्रेसिडेंट बीना शेट्टी, पिफाचे व्हाईस प्रेसिडेंट सुहास अकोले, धैर्यशील पाटील, अनुपमा जुवेकर, निपा खत्री, पत्रकार सुहास यादव, सुरेंद्र शेट्टि, ॲक्सेस म्युच्युअल फंडाचे पिनाकी दास, जीवन सबनीस, महेंद्र मेन्युलाईफ म्युच्युअल फंडाचे अमीत अरोरा, सुंदरम म्युच्युअल फंडाचे सुनील व भुषण पाटील, एच.डी.एफ.सी. म्युच्युअल फंडाचे गौरव विरमनी, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाचे विनय नरसिंहन, अनिरुद्ध निघोटे, मिरे ॲसेट म्युच्युअल फंडाचे मयुर धनोपीया, उदय कुलकर्णी, दिपाली महाजन, गौरव सोनी, संजय, कृष्णा पांढरे, यशवंत राठोड, केदार कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते, तसेच या सुंदर कार्यक्रमाची सुंदर फोटोग्राफी प्रथमेश पांढरे यांनी केली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक दत्तात्रय परळकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार अतिथी संपादक संदिप भूशेट्टी यांनी मानले.