13.6 C
New York
Friday, Apr 18, 2025
Bharat Mirror Marathi
नंदुरबार शिक्षा

बामखेडा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन सप्ताहाची सांगता

ग्रामविकास संस्थेच्या कला महाविद्यालयात मराठी विभाग ,राष्ट्रीय सेवा योजना विभाग, तसेच विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाच्या काळात विद्यार्थ्यांना कुसुमाग्रजांच्या साहित्याचा परिचय करून देण्यात आला.तसेच त्यांच्या कविता, नाटक , कादंबऱ्या या साहित्यातून समाज जीवन कसे रेखाटले याचा परिचय करून देण्यात आला.

तसेच डॉ.करंके यांनी विद्यार्थ्यांना मराठी शब्दकोश,विश्वकोश कसे बघावे यासाठी विद्यार्थ्यांना ग्रंथालयात जाऊन प्रत्यक्ष दाखविले त्याच प्रमाणे पुस्तकांशी मैत्री याखाली नवीन पुस्तकांची ओळख करून दिली याकाळात कविता वाचन, संवाद वाचन, भाषण, फलक लेखन इत्यादी विविध कार्यक्रम घेण्यात आली. त दि.०६/०३/२३ रोजी मराठी विभागात मराठी भाषा गौरव दिन सप्ताहाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉ.बी. एन. गिरासे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन मराठी विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. सी. एस. करंके यांनी केले कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. गिरासे यांनी मराठी भाषेच्या परिचय करून दिला मराठी भाषेतल्या बोली मराठी भाषेतले शब्दसंग्रह आणि इंग्रजी भाषेचा मराठीवर झालेला परिणाम याबद्दल त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले.

तसेच प्राचीन साहित्याचा आधुनिक साहित्याचा परिचय करून दिला.वि.दा. सावरकर व शिवाजी महाराज यांनी मराठी भाषेसाठी भाषाशुद्धीची चळवळ केली याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच मराठी भाषेची लवचिकता, सौंदर्य आपल्या विविध उदाहरणातून विद्यार्थ्यांना पाठवून दिले. कार्यक्रमाचे आभार प्रगटन मराठी विभागातील प्रा. रवींद्र पावरा यांनी केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Related posts

आयर्लंड सरकारने आयरिश संस्‍थांना आणले एकत्र; मुंबईमध्‍ये वैयक्तिक एज्‍युकेशन फेअरचा शुभारंभ

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात बिरसा मुंडा जयंती व महाबँक योजना उद्बोधन संपन्न

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात अल्ताफ हसमानी यांचे टॅक्स उदबोधन संपन्न

BM Marathi

Leave a Comment