धुळे, आपल्या मातीचा सुगंध फुलतोय सर्वत्र, नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे.आनंद व्यक्त करणे, दिवसभराच्या श्रमानंतर संध्याकाळी एकत्र येऊन नृत्य गायनाने विरंगुळा आणि मनोरंजन करणे यातूनच लोकनृत्याचा जन्म झाला. नृत्यातून आपण आपली भावना व्यक्त करू शकतो. या नृत्याला पुढे काही नियम लागू झाले.ज्यांनी स्वतः भोवती शास्त्राचं वलय आणि तंत्राची चौकट निर्माण केली त्या नृत्य शैलीला शास्त्रीय नृत्य शैली म्हणून मान्यता मिळाली. नृत्य हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. २९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो.
फोटोग्राफी, चित्रकला, गायन, वादन, लिखाण यांप्रमाणेच नृत्य, हा छंद केवळ एक आवड म्हणून न जोपासता व्यावसायिक क्षेत्र म्हणूनही निवडता येतो.या क्षेत्रात मध्ये लोकांने भरपूर नाव कमवले आहेत असेच खान्देशातील खोरी ता. साक्री जि. धुळे या गावातील श्री सचिन बागुल यांची कन्या कु. भूमिका बागुल हिने सुद्धा आता काही वर्षा पासून तिचे नृत्यचे विविध कार्यक्रममध्ये या क्षेत्रात उत्कृष्ट नृत्याचे खानदेश सह महाराष्ट्रात नाव लौकिक होत आहे व पारितोषिक मिळत आहेत तिच्या अगदी लहान वयामध्ये प्रगती होत असून पुढील या क्षेत्रामध्ये नक्कीच नाव पुढे नेईल असे चित्र समोर येत मागे काही दिवसापूर्वी स्टार प्रवाह या मराठी चैनल वरती चा कार्यक्रमात भाग घेत प्रदर्शन करण्यात आले होते, तसेच नुकत्याच नाशिक येथील धर्मराज फाउंडेशन आयोजित कार्यक्रमांमध्ये पण तिच्या नृत्याला पारितोषिक मिळालेला आहे यापूर्वी झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये पण तिला पारितोषिक मिळालेल्या असून तिच्या आई-वडिलांचे व भूमिकाचे सर्व परिसरातून अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छाचा वर्षाव हा कु.भूमिका यांच्यावर होत आहे.