भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरातमधील नवसारी मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते सी.आर.पाटील यांच्या विरोधात काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नैषद देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आज नैषद देसाई यांनी निवडणुका संपेपर्यंत गांधीजींच्या वेशात प्रचार करणार असल्याचे सांगितले. खादीचे कपडे परिधान करून हातात काठी घेऊन नवसारीतील जनतेपर्यंत गांधीजींचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. 19 एप्रिलला मटवाड ते दांडी अशी यात्रा काढण्यात येणार असल्याचे नैषद देसाई यांनी सांगितले.
फॉर्म भरण्यापूर्वी भाजपच्या सत्तेच्या भुकेच्या विरोधात पवित्र दांडी काठापासून मीठाचा सत्याग्रह करण्यात होता त्याच पद्धतीने यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर फॉर्म भरला जाईल. आजकाल भाजप मोदींच्या इशार्या काम करत आहे. अडवाणींपासून ते अटलजींपर्यंत सर्वांचे विचारांची पायमली झाली. तेव्हा काँग्रेस अहिंसकपणे भाजपच्या तावडीतून जनतेची सुटका करण्याचा प्रयत्न करेल.
निवडणुकीच्या खर्चासाठी काँग्रेस नेते म्हणाले कि आम्ही जनतेकडे जाणार आहोत. 10 ते 1000 रूपये घेवून पार्वती देऊन खर्च भागवण्याचा प्रयत्न करू. भाजपने इलेक्टोरल बाँड घोटाळा केला आहे. पैसे खर्च करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे आम्ही लोकांमध्ये जाऊ. आम्हाला विश्वास आहे की लोक आम्हाला मदत करतील. देसाई पुढे म्हणाले की, आम्ही जिंकण्यासाठी नव्हे तर संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी शहीद होण्यासाठी निघालो आहोत.