ग्रामविकास संस्थेच्या कला महाविद्यालय बामखेडे येथे १ ऑक्टोबर ते २ ऑक्टोबर पर्यंत ‘ स्वच्छता ही सेवा ‘ या कार्यक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यात महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणाची स्वच्छता केली .यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी विकास विभागातील विद्यार्थ्यी उपस्थित होते.
१ ऑक्टोबरला महाविद्यालयातील ग्रंथालय जवळील परीसर , स्टेडियम परीसर व महाविद्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली. दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील अध्यक्षस्थानी होते, तसेच प्रमुख वक्ते म्हणून मराठी विभागातील डॉ .सी. एस. करंके यांनी आपल्या मनोगतातून महात्मा गांधींचे जीवन कार्य आणि स्वातंत्र्य संग्रामातील महात्मा गांधींनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. तसेच गांधी विचार आजच्या तरुण पिढीला किती प्रेरणादायक आहेत याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्राचार्य यांनी महात्मा गांधींचे योगदान स्वातंत्र्यसंग्रामात किती महत्त्वाचे होते याबद्दल त्यांनी विचार मांडले. तसेच गांधींचे कार्य आजच्या युवकांना किती मार्गदर्शक आहे याविषयी गांधींच्या जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच लालबहादूर शास्त्री यांचे कार्य भारतीय इतिहासात किती महत्त्वाचे आहे.या बदल अनेक उदाहरणे दिलीत .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी. एन. गिरासे यांनी केले, कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. वाय. सी. गावित सर यांनी केली .तर आभार प्रगटन सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. डी. बी. वाघ यांनी केले व कार्यक्रमाची सांगता महात्मा गांधी यांच्या प्रार्थनेने केली. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.