Bharat Mirror Marathi
धुळे

सी.एम.भोई यांची नाशिक विभागीय अध्यक्ष पदी निवड

शिरपूर, भोई समाज सेवक म्हणून शिरपूर जिल्हा धुळे येथील श्री.सी.एम भोई सर गेल्या 30 वर्षांपासून अतिशय प्रामाणिक पणे समाज सेवेचे काम करत आहेत. त्यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने शिरपूर येथील भोई समाजाचे उत्तम काम सुरू आहे .आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले त्यात त्यांच्या सिहाचा वाटा आहे .वधू-वर परिचय मेळावे,विवाह मेळावे,गुणगौरव सोहळे,जयंती उत्सव, तंटामुक्त समितीचे खूप गौरवास्पद त्यांची कामगिरी राहिली आहे.

त्यांच्या ह्या कार्याची दखल घेत आखिल भारतीय भोई समाज सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ए.के.भोई यांनी सी.एम.भोई संराना धुळे,नंदुरबार व नाशिक या तीनही जिल्यांचे उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष पदी निवड झाल्याचे प्रमाणपत्र बहाल केले.

या प्रसंगी भोई समाज आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष भाईदास भोई, उपाध्यक्ष श्री.गुलाब भोई, तंटामुक्ती अध्यक्ष,शैक्षणिक गुणगौरव समितीचे अध्यक्ष  रविंद्र सोनवणे, शहराध्यक्ष भोजराज भोई, सुदाम मूवीज चे एम.डी. जगदीश मोरे, तरुण गर्जणाचे संपादक संतोष भोई , दिपक सुनिल ढोले,मनोज भोई, मयूर सोनवणे अजय भोई, राज सरलाल भोई, शरद मोरे, भरत मोरे, अभिमन मोरे, जगन्नाथ ढोले व ईतर सर्व समाज बांधव उपस्थित होते.या निवडीबद्दल सर्व समाज बांधवांनी सरांचे अभिनंदन केले.

Related posts

तऱ्हाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराची सुरवात

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयाचे रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबिर त-हाडी येथे संपन्न

BM Marathi

वरुळ गावाचे विजयसिंग प्रतापसिंग गिरासे यांना जेष्ठ वारकरी संप्रदाय पुरस्कार जाहीर

BM Marathi

Leave a Comment