नंदुरबार ( प्रतिनिधि ) ग्रामविकास संस्था संचलित कला महाविद्यालय बामखेडा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ वाय.सी.गावीत यांनी केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एच.एम. पाटील होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. के. पी. पाटील यांनी ‘ संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘ या विषयावर व्याख्यान दिले. याप्रसंगी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तसेच शिक्षणासाठी त्यांनी कोणत्या प्रकारे मेहनत केली याविषयी मार्गदर्शन केले. तसेच संविधानातील मूलतत्त्वे संविधानाचे आजच्या काळातील महत्त्व संविधानामुळे सामान्य माणसाला मिळालेल्या अधिकार व कर्तव्य अशा अनेक गोष्टींचे त्यांनी विश्लेषण केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पु.सा.गु.वि.प्र.मंडळाचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथील डॉ.सतिश भांडे व प्रा.एस.आर.उजगरे उपस्थित होते.मा.प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कठोर ज्ञान तपश्चर्या विषयी विविध उदाहरणे दिली. बाबासाहेबांच्या कर्तुत्वामुळे सामान्य माणसाला न्याय प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ.सी.एस .करंके यांनी केले तर आभार प्रकटन प्रा रविंद्र पावरा यांनी मानले. कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.