11.3 C
New York
Thursday, Nov 21, 2024
Bharat Mirror Marathi
व्यापार-उद्योग

बॉम्‍बे चेंबरने २००० एमएसई सदस्‍यांना दुप्‍पट ते १० पट वाढ करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी वाधवानी फाऊंडेशनसोबत केला सहयोग

 ‘एसएमई ग्रोथड्राइव्‍ह’ हा पात्र एसएसएमईंना विकासाच्‍या पुढील टप्‍प्‍यावर घेऊन जाण्‍यास मदत करणारा धोरणात्‍मक उपक्रम

मुंबई, 20 सप्‍टेंबर २०२२: महामारीमुळे एमएसएमई क्षेत्राचे मोठे नुकसान झाले, पण २०२० व २०२१ मध्‍ये टिकून राहण्‍याच्‍या संघर्षामध्‍ये यशस्‍वी होत मोठे धैर्य दाखवले. अनेकांनी कोविड-१९ च्‍या प्रतिकूल परिणामांवर मात केली. आज यापैकी अनेक एसएमई झपाट्याने महसूल व मार्जिन वाढ करत असताना विकसित होण्‍याच्‍या क्षमतांसह त्‍यांना सक्षम करण्‍यामध्‍ये तज्ञ हस्‍तक्षेप/ सल्‍ला/ संस्‍थांचा पाठिंबा मोठा बदल घडवून आणू शकतो. हीच बाब अनेक लहान उत्‍पादक कंपन्‍यांना देखील लागू आहे, जे मध्‍यम आकाराच्‍या उद्योगांनी दाखवलेल्‍या विकासाच्‍या मागे पडले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर बॉम्‍बे चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्‍ड इंडस्‍ट्री (बीसीसीआय) या देशातील सर्वात जुन्‍या चेंबर आणि वाणिज्‍य व व्‍यापाराच्‍या विकासाला पाठिंबा देण्‍यामध्‍ये अग्रणी असलेल्‍या कंपनीने २००० प्रबळ बीसीसीआय एसएमई सदस्‍यांना दुप्‍पट ते १० पट विकसित होण्‍यास मदत करण्‍याच्‍या उद्देशाने ‘एसएमई ग्रोथड्राइव्‍ह’ लॉन्‍च करण्‍याकरिता २०१९ मध्‍ये सुरू करण्‍यात आलेला उल्‍लेखनीय व नाविन्‍यपूर्ण एसएमई केंद्रित उपक्रम वाधवानी अॅडवाण्‍टेजसोबत (वाधवानी फाऊंडेशनचा एसएमई-केंद्रित उपक्रम; https://advantage.wfglobal.org/) सहयोग केला आहे.

एसएमई ग्रोथड्राइव्‍ह हा गो-टू डेस्टिनेशन उपक्रम आहे, जो वाधवानी अॅडवाण्टेज येथील तज्ञांसोबत सहयोगाने बीसीसीआयच्‍या एसएमई सदस्‍यांना नैदानिक परिवर्तन सल्‍ला, माहिती व नेटवर्किंग ऑफरिंग्‍ज देतो. हा उपक्रम विकास करण्‍याची उत्‍कट आवड असलेल्‍या, व्‍यावसायिक बनण्‍याची इच्‍छा असलेल्‍या आणि माहिती जाणून घेण्‍यास कटिबद्ध असलेल्‍या एसएमई आंत्रेप्रीन्‍युअर्स व टॉप मॅनेजमेंटची निवड करण्‍यासोबत त्‍यांना सुसज्‍ज करेल.

या उपक्रमाबद्दल बोलताना बीसीसीआयचे महा-संचालक श्री संदीप खोसला म्हणाले, “गेल्या दोन वर्षे एसएमई व्यवसायांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. त्यांच्या पुनर्प्राप्ती प्रक्रियेत त्यांना पाठिंबा देण्याच्‍या उद्देशाने बॉम्बे चेंबरने २००० बीसीसीआय एसएमई सदस्‍यांना मार्गदर्शन करण्‍यामध्‍ये आपली कौशल्‍ये देऊ शकतील, अशा मोठ्या कंपन्‍यांच्‍या आमच्या प्रबळ सदस्‍यत्‍वाचा लाभ घेत अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. वाधवानी फाऊंडेशनसोबतचा आमचा सहयोग आमच्या एसएमई सदस्यांना पाठिंबा देण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.”

या सहयोगाबाबत सांगताना वाधवानी फाऊंडेशन येथील वाधवानी अॅडवाण्टेजचे कार्यकारी उपाध्‍यक्ष श्री. समीर साठे म्‍हणाले, ‘’आम्‍हाला वाधवानी अॅडवाण्‍टेजच्‍या माध्‍यमातून बीसीसीआयच्‍या एसएमई सदस्‍यांना मदत करण्‍यासाठी हा अद्वितीय उपक्रम सुरू करण्‍याकरिता त्‍यांच्‍यासोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. वाधवानी अॅडवाण्‍टेज हा अग्रणी जागतिक उपक्रम आहे, ज्‍यामध्‍ये सक्षमीकरण, सल्‍लामसलत व व्‍यावहारिक मदत, समस्‍येचे निराकरण करण्‍याबाबत माहिती, वेळ, कौशल्ये आणि एसएमईंच्‍या आर्थिक समस्‍या यांचा समावेश आहे. आम्‍ही आशा करतो की, एकमेकांच्‍या क्षमतांचा लाभ घेत एसएमई लाभार्थींना अपेक्षित अनुकूल परिणाम मिळतील आणि इतरांसाठी अनुकरणीय अशी केस स्‍टडी सादर होईल.’’

बीसीसीआयच्‍या एमएसएमई कमिटीचे अध्‍यक्ष आणि निचेम सोल्‍यूशन्‍स प्रा; लि.चे संचालक श्री. राजन राजे म्‍हणाले, ‘’एमएसएमई राष्‍ट्रीय अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते. ते मध्‍यम व मोठ्या उद्योगांसाठी आधारस्‍तंभ आहेत. म्‍हणून ते १० ट्रिलियन डॉलर अर्थव्‍यवस्‍थेपर्यंत पोहोचण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतील. ज्‍यामुळे एमएसएमई क्षेत्रासाठी आवश्‍यक कौशल्‍ये व व्‍यावसायिकता संपादित करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. बीसीसीआयने ही बाब ओळखली आणि या क्षेत्राला विश्‍वसनीय पाठिंबा देण्‍यसाठी उपक्रम हाती घेतला. वाधवानी फाऊंडेशनसोबतचा त्‍यांचा सहयोग या दिशेने पहिले पाऊल आहे. वाधवानी फाऊंडेशन आपल्‍या तज्ञांच्‍या सहयोगाने या पॉलिक्लिनिकला प्रभावीपणे चालना देईल.’’

बीसीसीआय आणि वाधवानी अॅडवाण्‍टेज (डब्‍ल्‍यूए) आपल्‍या संबंधित क्षमतांना एकत्र करत एसएमई ग्रोथड्राइव्‍हचे पुढील लाभ देतील, जे इतरत्र उपलब्‍ध असलेल्‍या इतर सहाय्यक यंत्रणांपेक्षा वेगळे आहेत

Related posts

“मला लॅपटॉप कसा वापरायचा हे देखील माहित नव्हते”: प्रसिद्ध कंटेन्ट क्रिएटर रेखा सिंह 

BM Marathi

बोहरिंगर इंगेलहेम इंडियाने राज्यातील स्ट्रोक केअर मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार बरोबर सामंजस्याचा करार केला

BM Marathi

महाराष्ट्र ग्रामीण बँकचे चेतना  सायकल रॅली अंतर्गत यशस्वी मार्गक्रमण

BM Marathi

Leave a Comment