शिरपुर, 1999 या शैक्षणिक वर्षात दहावीत असलेल्या विद्याथाचे स्नेहमिलन कार्यक्रम नुकताच शिरपुर येथे पार पडला. यावेळी उत्सुकता सोबतच मनात दाटून येणाऱ्या आठवणींमुळे भावुक होणाऱ्या वातावरणात स्नेहमेळावा रंगला. शिरपुर तालुक्यातील सर्वात जुनी शाळा असलेल्या नुतन विद्यालय भटाणेने आजपर्यंत हजारों विद्यार्थी घडवले आहेत.
शिरपुर तालुक्यातील भटाणे या ग्रामीण भागात नुतन विद्यालय आहे. ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची गंगा पोहचविण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणाचे उद्दिष्ट समोर ठेवून विद्यालयाची पायाभरणी करण्यात आली. स्वत:च्या उद्धार करायच्या असेल तर त्याला पर्याय नाही. तो स्वत:लाच करावा लागेल याचा अवलंब करत आजपावेतो अनेक विद्यार्थी विद्याथिनी ग्रामीण भागातून दर्जेदार शिक्षण घेउन अनेक राज्यात नोकरी, उद्योग आणि व्यवसायात कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांनी बऱ्याच वर्षानंतर स्नेहमेळावा आयोजित केला होता. महाराष्ट्रसह इतर राज्यात विविध ठिकाणी कार्यरत असलेले 1999 च्या दहावीच्या बॅचचे सर्वच विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी परिचय करून देत ते कार्यरत असलेल्या अथवा करीत असलेल्या कामांबाबत माहिती दिली. प्रास्ताविक राकेश साळुंके तर आभार ज्योती पाटिल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी ज्योती पाटील, आशा सोनवणे, दरबारसिंग गिरासे, विकास मराठे आदि सर्वांनी परिश्रम घेतले.