नंदुरबार : ग्रामविकास संस्था बामखेडा त.त. ता शहादा संचलित कला महाविद्यालय बामखेडा येथे विज्ञान विद्याशाखा सुरु करण्याची शासनाची परवानगी नुकतीच मिळाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शहादा शिरपूर न जाता त्यांना विज्ञान शाखेत प्रवेश घेता येईल. काॅम्पुटर सोबतच इतर विषयांचा अभ्यासक्रमांचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येईल.
त्याच बरोबर पी एम युषा अंतर्गत अनेक लघु कौशल्यवर्धक अभ्यासक्रम ही पूर्ण करता येईल .ज्यामुळे ग्रामिण भागातला विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहील अशी आशा संस्थेचे अध्यक्ष मा.पी.बी.पटेल, सचिव मा.बी.व्ही.चौधरी उपाध्यक्ष डॉ .के.एच.चौधरी यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षणाची संधी ग्रामीण भागात उपलब्ध करुन दिल्याबद्दल संस्थेच्या दुरदर्शीपणा बद्दल प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी संस्थाचालकांचे आभार केले आहे या संधीचा फायदा बामखेडे त.त. पंचक्रोशीतील विद्यार्थी पालकांनी घ्यावा असे आव्हान संस्थे तर्फे करण्यात आले आहे.
संस्थेला विज्ञान शाखा मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री व या जिल्ह्याच्या कन्या रक्षाताई खडसे, माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसे, ना. विजयकुमार गावीत,आमदार जयकुमार रावल,आदिंचे सहकार्य लाभले.