-5.2 C
New York
Friday, Jan 24, 2025
Bharat Mirror Marathi
देश महाराष्ट्र राज्य व्यापार-उद्योग

मुंबईची असीमित ऊर्जा, सर्वसमावेशकता आणि एकता जपण्याच्यादृष्टीने मुंबई फेस्टिव्हल 2024 साठी ‘प्रत्येक जण आमंत्रित’

पर्यटनमंत्री गिरीश महाजन, मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्याकडून फेस्टिव्हल लोगो आणि गाण्याचे अनावरण

मुंबई, 23 नोव्हेंबर 2023: राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी वचनबद्ध असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने, आज ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ ची घोषणा केली.  गिरीश महाजन,  पर्यटन मंत्री, महाराष्ट्र शासन यांच्यासह  आनंद महिंद्रा, अध्यक्ष – मुंबई फेस्टिवल सल्लागार समिती व , डॉ. बी. एन. पाटील, संचालक, पर्यटन संचालनालय द्वारे मुंबई फेस्टिवल २०२४ च्या घोषणेनंतर मुंबई फेस्टिव्हलचा लोगो, ‘सपनो का गेटवे’ या थीमचे लोकार्पण करण्यात आले, यानंतर प्रख्यात संगीतकार शमीर टंडन यांनी रचलेल्या थीम गीताचेदेखील लोकार्पण केले गेले. गाण्यातून मुंबईची असीमित ऊर्जा आणि विविधतेत नटलेल्या एकतेचे दर्शन घडून येते. सुपरस्टार चित्रपट दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा याने मुंबई फेस्टिव्हलच्या गाण्याला जिवंत करणारे हुक स्टेप्स सादर करून थीम साँग सादरीकरणात आणखी भर घातली. तसेच नर्तकांनी मीडियाला हुक स्टेप्स शिकवल्या आणि प्रत्येकाला एक नवीन लय आणि हालचाल तयार करण्यास भाग पाडले.

20 जानेवारी ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत सुरू होणारा नऊ दिवसांचा मुंबई फेस्टिव्हल ’प्रत्येक जण आमंत्रित’ या थीमसह एकतेची भावना दर्शवेल. ’सपनो का गेटवे’ या स्वप्नांच्या शहरात प्रत्येकाचे स्वागत आणि आलिंगन देणारे थीम साँग हे  ‘मेल्टिंग पॉट’ म्हणून मुंबईच्या सर्वसमावेशकतेवर भर देते. या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत कार्यक्रम, खाद्य महोत्सव आणि बरेच खूप काही कार्यक्रमांची मेजवानी असेल.

मुंबई फेस्टिव्हल 2024 लाँचिंग आणि घोषणा समारंभात बोलताना राज्याचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन  म्हणाले की, महाराष्ट्र शासनद्वारे मुंबईच्या विविध पैलूंना साजरे करण्यासाठी मुंबई फेस्टिव्हल 2024 चे आयोजन केले जात आहे. हा उत्सव मुंबईकरांच्या भावना आणि शहराच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसावर प्रकाश टाकणारे अनुभव आणि उपक्रम एकत्र आणणारा आहे.

पर्यटनाला चालना देणे, विकास आणि सर्वसमावेशकता जोपासणे आणि उद्योगात नवीन संधी आणि मार्ग निर्माण करणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. मुंबई फेस्टिव्हल 2024 हा केवळ एक कार्यक्रम नाही; हा एक परिवर्तनकारी अनुभव आहे, जो भारताने पाहिलेल्या सर्वात मोठ्या वार्षिक उत्सवांपैकी एक असेल. मुंबईकरांच्या अदम्य भावनेचे सार टिपणारा, तिथल्या समृद्ध ऐतिहासिक वारसाचा वेध घेणारा आणि या गतिमान शहराची व्याख्या करणार्‍या प्रत्येक पैलूला सामावून घेणारा हा उत्सव म्हणजे मुंबईला समर्पित करण्याऱ्या या महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे पर्यटनमंत्री गिरीश महाजन म्हणाले.

मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी आपल्या भाषणात,  मुंबई फेस्टिव्हलचे महत्त्व अधोरेखित केले. हा एक विलक्षण अनुभव देणारा उत्सव आहे. या फेस्टिव्हलमुळे मुंबईच्या संस्कृतीचे एकत्रित दर्शन होईल. शिवाय सर्व मुंबईकरांना एकत्र आणण्यात या फेस्टिव्हलचा मोठा वाटा आहे. ’प्रत्येकजण आमंत्रित आहे,’ ही फेस्टिव्हलची थीम समर्पक आहे. मुंबई फेस्टिव्हलच्या माध्यमातून, प्रत्येकजण कला, संस्कृती, क्रीडा, फॅशन आणि बरेच काही एकत्र करून अनेक कार्यक्रमांद्वारे या अनोख्या उत्सवाचे साक्षीदार होता येणार आहे. हा फेस्टिव्हल केवळ एक कार्यक्रम नाही; उपस्थितांसह रसिकांसाठी हा अवर्णनीय आनंद असेल, असे महिंद्रा म्हणाले.

महाराष्ट्र शासनने विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सी प्रा. लि. कंपनीकडे मुंबई फेस्टिव्हलच्या व्यवस्थापनेची धुरा सोपवली आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी मुंबई फेस्टिव्हलचे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. इव्हेंट लाइन-अपमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, व्हायब्रंट म्युझिक फेस्ट, महा मुंबई एक्स्पो, मनमोहक सिनेमा, बीच फेस्ट, मूव्ही स्पर्धा आणि रोमांचक क्रिकेट क्लिनिक, स्टार्ट-अप फेस्ट अशा विविध आणि आकर्षक उपक्रमांचा समावेश आहे.

मुंबई वॉक हे मुंबई फेस्टिव्हलच्या वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यांपैकी एक आहे. या वॉकद्वारे मुंबईचे गतिचक्र कायम ठेवण्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या डबेवाला, पोलिस हवालदार, बेस्ट बस ड्रायव्हर आणि कंडक्टर तसेच सफाई कामगार, सफाई कर्मचारी आदी मुंबईवीरांचा सत्कार करण्यासाठी शहरातील आयकॉन्स एकत्र येतील.

मुंबई फेस्टिव्हलचे मुख्य आकर्षण म्हणजे शॉप अँड विन फेस्टिव्हल. ज्यामध्ये एकाधिक रिटेल आणि डायनिंग आउटलेट्स तसेच मनोरंजनाच्या संधींचा समावेश असेल. यातील मेगा बक्षिसांमध्ये अनेकांची स्वप्ने सत्यात उतरतील.

मुंबई मॅरेथॉन, काळा घोडा कला महोत्सव, हॅपी स्ट्रीट्स, योगा बाय द बे, आरोग्यम कीडझेथॉन हे मुंबई महोत्सवाचे सहयोगी कार्यक्रम म्हणून भाग आहेत. ज्यामुळे शहराच्या सांस्कृतिक उत्सवात आणखी भर पडेल.

मुंबई फेस्टिव्हलचे प्रस्तावित वेळापत्रक यावेळी जाहीर करण्यात आले, त्यासोबतच या फेस्टिव्हलमधील चित्रपटाचे स्क्रीनिंगही करण्यात आले.

Related posts

बामखेडा महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

BM Marathi

सुरत : सरसाणात तीन दिवसीय फूड अँड ॲग्रीटेक एक्स्पो-2024 सुरू

BM Marathi

मुंबईतील जीतो अहिंसा रनमध्ये 500 दृष्टिहीन मुले सहभागी होणार 

BM Marathi

Leave a Comment