24 C
New York
Saturday, Sep 13, 2025
Bharat Mirror Marathi
धुळे नंदुरबार शिक्षा

बामखेडा रासेयो श्रमसंस्कार शिबिराला मान्यवरांच्या भेटी

शिरपुर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व ग्रामविकास संस्थेचे कला महाविद्यालय बामखेडे त.त. यांच्या संयुक्त विद्यमाने रासेयो शिबीर त-हाडी येथे दिनांक २८ जानेवारी २३ ते ३ फेब्रुवारी २३ या कालावधीत आयोजित करण्यात आले.तेथे अनेक मान्यवरांच्या भेटी झाल्या.
३१ जानेवारीला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेविका डॉ.बडगुजर मॅडम, विखरण प्राथमिक केंद्राचे डॉ. चौधरी मॅडम आणि डॉ. शिरसाठ यांनी शिबीर स्थळी मधूमेह आणि रक्तदाब शिबीर आयोजित करून लोकांना मार्गदर्शन केले.त्यात १२३ लोकांना लाभ मिळाला.

तसेच संध्याकाळी ग्रामविकास संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.के.एच.चौधरी‌ यांनी भेट दिली. त्यांनी शिबीरातील कामाचा आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.त्याचप्रमाणे दि ०१ रोजी मा.प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील,श्री आर.ए.पटेल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि दैनंदिन कामकाजाची चौकशी केली.

याच दिवशी संध्याकाळी प्रियदर्शनी सुतगीरणीचे संचालक बापूसो सुदाम नथ्थू भलकार यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधला.दि.०२ फेब्रुवारी रोजी लोकनियुक्त सरपंच सौ.जयश्री सुनील धनगर यांनी एक मुठ धान्य संकलन या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.तसेच गावातील समाजिक कार्यकर्ते संजय जाधव, सुनील धनगर, प्रतापसिंग गिरासे,विजय सोनवणे, रावसाहेब कदम, युवराज जाधव यांनी शिबीर स्थळी येऊन विद्यार्थ्यांना अल्पोपहार दिला.ग्रामविकास संस्थेचे सचिव मा.बी.व्ही.चौधरी यांनी भ्रमरध्वनी वरुन संवाद साधून शिबीरार्थीनी केलेल्या कामाचे कौतुक केले.

दि. ०२ फेब्रुवारी २०२३ नरडाणा महाविद्यालयातील प्राध्यापक, आणि विद्यार्थी यांनी शिबिराला भेट दिली. तसेच रात्री आठ वाजता कबचौ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.सचिन ज.नांद्रे, नंदूरबार जिल्हा समन्वयक डॉ.विजय पाटील, नंदूरबार जिल्हा विभागीय समन्वयक डॉ.विशाल कर्पे यांनी शिबीराला भेट दिली. विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे अवलोकन केले,तसेच त्यांच्याशी संवाद साधला व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

३ फेब्रुवारी २३ रोजी समारोप प्रसंगी ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मा. पी.बी.पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले उज्जनबाई अहिरे .मा.सुदाम नथू भलकार,मा. सुनील बुधा धनगर रावसाहेब कदम, युवराज भलकार , ज्ञानेश्वर भलकार ,संजय जाधव, इत्यादी समारोप प्रसंगी उपस्थित होते.त्यांनी कार्यक्रम अधिकारी डॉ.सी.एस.करंके.सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.वाय.सी.गावीत याचे वरील सर्व मान्यवरांनी कौतुक केलं.

Related posts

मुंबईतील जीतो अहिंसा रनमध्ये 500 दृष्टिहीन मुले सहभागी होणार 

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

BM Marathi

राज्यस्तरीय कविसंमेलनात सुमन हायस्कूल – 5 ची विद्यार्थिनी प्रथम

BM Marathi

Leave a Comment