बामखेडा येथील कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदी निवड झाली. सदर निवड ही विद्यापीठ कायद्यानुसार झालेल्या निवडणुकी द्वारे झालेली आहे. प्राचार्य डॉ.एस. पी. पाटील यांना एनमुक्ता या संघटनेचा भरघोस पाठिंबा होता. त्यामुळे ते मुक्ता प्रणित प्राचार्य झालेले आहेत. एनमुक्ता प्रणित प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील हे एकमेव प्राचार्य सिनेटपदी निवडल्यामुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे. बामखेडा या छोट्याशा गावातील महाविद्यालयाने यापूर्वीही नॅकची बी प्लस प्लस ग्रेड मिळवून यशस्वी झालेले आहे.
प्राचार्य डॉ.एस. पी. पाटील यांची सिनेट सदस्य पदी निवड झाल्यामुळे महाविद्यालयीन यशाची परंपरा टिकलेली आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयाच्या प्राचार्याची यशस्वी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांचा जळगाव येथे भव्य सत्कारही केला. ही बाबही बामखेडा गावाच्या दृष्टीने अत्यंत गौरवशाली आहे. प्राचार्य डॉ.एस. पी.पाटील यांच्या निवडीसाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे सर्व सदस्य, सर्व प्राध्यापक आणि मुक्ताचे अध्यक्ष नितीन बारी यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. एस. पी. पाटील यांच्या निवडीबद्दल ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष श्री पी.बी.पटेल,उपाध्यक्ष डॉ. के. एच. चौधरी, सचिव श्री बी.व्ही. चौधरी संस्थेचे सर्व सदस्य, महाविद्यालयाचे कर्मचारी, ग्रामविकास संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी विशेष कौतुक केले आहे.