5.2 C
New York
Wednesday, Nov 27, 2024
Bharat Mirror Marathi
व्यापार-उद्योग

प्रेसिडंट – वाधवानी एंटरप्रेन्योर पदावर मीतुल पटेल यांच्या नियुक्तीची वाधवानी फाउंडेशनकडून घोषणा

मुंबई, 20 डिसें. 2022वाधवानी फाउंडेशनने प्रेसिडंट – वाधवानी एंटरप्रेन्योरया महत्त्वाच्या पदावर मीतुल पटेलयांची नियुक्ती झाल्याची घोषणा आज केली. उद्योजकतेची उभारणी करण्यावर व छोट्या व्यवसायांच्या वाढीस वेग देण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या वाधवानी फाउंडेशनच्या उपक्रमांची धुरा आता मीतुल पटेल सांभाळतील. आशिया, आफ्रिका आणि लॅटीन अमेरिकेमध्ये सर्वत्र फाउंडेशनची विस्तारती कार्यकक्षा लक्षात घेऊन ही धोरणात्मक नियुक्ती करण्यात आली असून उच्च दर्जाच्या नोकऱ्या निर्माण करण्याच्या व लक्षावधी आयुष्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या फाउंडेशनचे ध्येय अधिक बळकट करणे व त्याची व्याप्ती वाढविणे हे त्यामागचे लक्ष्य आहे.

मीतुल यांनी याआधी मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या अद्याप अस्पर्शीत बाजारपेठांपर्यंत तंत्रज्ञानाचे फायदे पोहोचविण्यासाठी धोरणात्मक भागीदारी आणि नवीन मंच विकसित करण्यास जबाबदार असलेल्या स्ट्रॅटेजिक ग्रोथ विभागाचे प्रमुखपद सांभाळले आहे. ही भूमिका निभावण्याआधी ते मायक्रोसॉफ्ट इंडियाचे सीओओ होते व त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या भारतातील उपकंपनीसाठी बिझनेस व प्रोडक्ट प्लानिंग, मार्केटिंग आणि सेल्स ऑपरेशन्स या विभागांवर देखरेखीचे काम केले आहे. हे पद सांभाळताना त्यांच्यावर संस्थेचे धोरण निश्चित करणे, गुंतवणूकींचे व्यवस्थापन करणे आणि एकूणच समन्वय साधणे ही कामे सांभाळली व उद्योगक्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, छोटे व्यवसाय, ग्राहक आणि भागीदारी अशा सर्व क्षेत्रांमध्ये परिवर्तनाला सामोऱ्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या पोर्टफोलिअोची वाढ होणाच्या दृष्टीने पावले उचलली होती.

फाउंडेशनचा भाग बनत असल्याबद्दल आपला आनंद व्यक्त करताना वाधवानी फाउंडेशनमध्ये प्रेसिडंट वाधवानी एंटरप्रेन्योर पदाची सूत्रे हाती घेणारे मीतुल पटेल म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचे बीज रुजविण्यासाठी आवश्यक त्या संसाधनांच्या उपलब्धतेचे लोकशाहीकरण करण्यासाठी, उद्योजकांना नवीन व्यवसाय उभारणीच्या त्यांच्या प्रवासामध्ये सक्षम बनविण्यासाठी आणि प्रस्थापित छोट्या उद्योगांच्या वाढीला गती देण्याच्या प्रयत्नांत त्यांना पाठबळ देण्यासाठी वाधवानी फाउंडेशन टीमच्या साथीने काम करण्यास आणि त्यांच्या सामायिक यशाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करत जेमतेम तग धरून असलेल्या लक्षावधी लोकांच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणण्यास मदत करण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे.”

मीतुल यांच्या नियुक्तीमुळे परिसंस्था, तांत्रिक मंचांचा वापर करून घेण्याचा त्यांचा अनुभव आणि वैश्विक दृष्टिकोन या सगळ्याचा फायदा फाउंडेशनच्या उपक्रमांची व्याप्ती वाढविण्यासाठी होणार आहे व त्यामुळे फाउंडेशनच्या आधीच उच्चकुशलता प्राप्त केलेल्या आणि अनुभवी ग्लोबल मॅनेजमेंट टीमला अधिकच बळ मिळणार आहे.

मीतुल पटेल पुढे म्हणाले, “गेल्या काही दशकांमध्ये जगभरातच प्रचंड बदल झालेले आपण पाहिले आहेत, मात्र तरीही मोठ्या संख्येने कुटुंबं अजूनही जीवनमानाचा एक किमान दर्जा राखण्यासाठीही झगडत आहेत. सर्वांची सामाजिक भरभराट व्हायची असेल तर ग्लोबल साउथमधील रोजगाराच्या शोधात असलेल्यं लक्षावधी लोकांसाठी त्यांची कुटुंबं तग धरू शकतील अशा नोकऱ्या निर्माण केल्या जायला हव्यात. छोटे व्यवसाय आपल्या गतीमान वाढीच्या माध्यमातून अशा नोकऱ्या निर्माण करण्याची सर्वाधिक क्षमता बाळगून असतात आणि अशी व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी व त्यांना हवी असलेली परवडण्याजोगी आणि शाश्वत उत्पादने पुरविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना विकसित करण्याची क्षमता ही उद्योगजगांमध्ये असते.”

Related posts

जेके टायरने केले महाराष्ट्रात आपले रिटेल अस्तित्व आणखी मजबूत

BM Marathi

बंधन बँकेतर्फे आठ वर्षांपेक्षा कमी काळात शाखांच्या संख्येत तिपटीने वाढ

BM Marathi

स्पाईस मनीकडून मुख्य मार्केटिंग ऑफिसरच्या भूमिकेसाठी कुलदीप पवारकडून नेतृत्व संघ मजबूत

BM Marathi

Leave a Comment