धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपाच्या सौ. अश्विनी जाधव (पाटील) यांची दिनांक 14 ऑक्टोबर रोजी निवड झाली. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा प्रमुख उपस्थित त्यांच्या सत्कार करुन शुभेच्छा दिल्यात.
यावेळी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद्र जाधव, शिरपूर तालुका चिटणीस सुनिल चौधरी, भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य रविंद्र भोई, भाजपा अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, भाजपा शहर चिटणीस राधेश्याम भोई, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष राजपुत, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष कुणाल माळी, भुषण जाधव आदि यावेळी उपस्थित होते.