25.7 C
New York
Sunday, May 4, 2025
Bharat Mirror Marathi
व्यापार-उद्योग

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा अभिनव उपक्रम : वित्तीय समावेशन व आर्थिक साक्षरता अभियान मराठवाडा पातळीवरील चेतना  सायकल रॅली

औरंगाबाद –  अध्यक्ष  मिलिंद घारड यांच्या कल्पकतेतून २० जुलै ते ३१ जुलै २०२२ या दरम्यान मराठवाड्यातील ३० गावातून व सर्व जिल्ह्यातून “वित्तीय समावेशन व आर्थिक साक्षरता अभियान ”  ५५० कि मी सायकल रॅली बँकेच्या १३ व्या वर्धापन दिन तसेच स्वातंत्राचा अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित करण्यात आली असून  या अभियानचे आयोजन महाराष्ट्र ग्रामीण बँक व नाबार्ड मार्फत केले आहे.

रॅलीच्या दुसर्‍या दिवसाची सुरवात बदनापुर पासून सुरू झाली व शेलगाव, गोलापांगरी मार्गे 51km अंतरावर जालना जिल्ह्यातील अंबड येथे मुक्काम करण्यात आला. यावेळीही प्रत्येक शाखेवर ढोल ताशांच्या जल्लोषात चेतना सायकल रॅलीचे स्वागत होताना पाहण्यात आले. ग्रामस्थांन कडून रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वारकरी समाजाची परंपरा राखत वित्तीय साक्षरतेच्या या दिंडीत फुगडी देखील खेळण्यात आली. स्वतः अध्यक्ष साहेबांचा सहभाग हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

शेलगाव, गोलापांगरी व अंबड येथे भव्य मेळावे घेण्यात आले ज्यात अध्यक्ष मिलिंद घारड साहेबानी वित्तीय साक्षरता, डिजिटल पेमेंट तसेच कर्जाची नियमित परतफेड व त्याचे लाभ अश्या विविध विषयांवर बहुमूल्य अशे मार्गदर्शन केले. मठपिंपळगाव येथे बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्री. संतोष प्रभावती सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी लघुनाट्य सादर करून शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल पेमेंट चे फायदे समजवून दिले. तसेच काही ठिकाणी वृक्षवाटप देखील करण्यात आले. यातून बँकेची ग्रामीण भागातील लोकांसोबत जोडलेली नाळ अजून घट्ट होत आहे.

या सायकल रॅलीचे अजून एक वैशिष्ट्य अशे की 20 ते 65 या वयोगटातील कर्मचारी अतिशय उत्साहाने सहभागी झालेले असून 550km प्रवासाचे आव्हान अतिशय शिताफीने पेलत आहेत. माननीय अध्यक्ष श्री. घारड सर यात आघाडीवर आहेत. त्यांच्या सोबत सरव्यवस्थापक ,मुख्य व्यवस्थापक, अधिकारी व ग्राहक देखील सामील झाले आहेत. अध्यक्ष साहेबांच्या दमदार नेतृत्वाखाली चेतना सायकल रॅलीचा उद्देश्य सफल होताना दिसत आहे.

Related posts

बॉम्‍बे चेंबरने २००० एमएसई सदस्‍यांना दुप्‍पट ते १० पट वाढ करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी वाधवानी फाऊंडेशनसोबत केला सहयोग

BM Marathi

वॉशिंग्टनसह अमेरिकेतील हॉटेल्समध्ये उत्पादने आणि सेवांना मोठी मागणी

BM Marathi

जेके टायरने केले महाराष्ट्रात आपले रिटेल अस्तित्व आणखी मजबूत

BM Marathi

Leave a Comment