येत्या वीकेण्डला, मनोरंजनाच्या डबल डोस घेण्यास तयार राहा कारण ‘झी सिनेमा’ वाहिनी 27 मे रोजी रात्री 8.00 वाजता आणि 28 मे रोजी दुपारी 12.00 वाजता अनुक्रमे ‘मिशन मजनू’ आणि ‘फोन भूत’ चित्रपटांचे वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर प्रसारित करणार आहे.
‘मिशन मजनू’ चित्रपटात बॉलीवूडचा शेरशहा ऊर्फ सिध्दार्थ मल्होत्रा याला एका जांबाझ गुप्तहेर एजंटच्या भूमिकेत पाहा. त्यात एक धोकादायक मिशन त्याने कसे पार पाडले, त्याची ही कथा पडद्यावर जिवंत करण्यात आली आहे. इसके बाद जो भूत हसाएंगे भी और डराएंगे भी उनसे मिलने का समय आएगा. कारण तेव्हा ‘फोन भूत’ हा मजेदार कॉमेडी असलेला भयपट प्रसारित केला जाईल. त्यात कत्रिना कैफ ही पूर्णपणे नव्या अवतारात दिसेल. तिच्यासोबत सिध्दान्त चतुर्वेदी आणि ईशान खट्टर असेल. मग तुम्ही वाट कशाची पाहताय? अल्टिमेट वीकेण्ड आला आहे, तेव्हा पाहात राहा ‘झी सिनेमा’!
एक मिशन जिसपर टिकी उम्मीद पूरे देश की… अमनदीप सिंह ऊर्फ सिध्दार्थ मल्होत्रा तुम्हाला गुप्तहेरांच्या विश्वात घेऊन जाईल. त्यात थरारक स्टंट प्रसंग आणि भारताला वाचविण्यासाठी दिलेला लढा असेल. त्यात राष्ट्रीय सेन्सेशन झालेल्या रश्मिका मंदानाच्या भूमिकेमुळे मिशन मजनू हा चित्रपट देशभक्ती आणि प्रेमाची कथा बनला आहे. ऐन पाकिस्तानात भारताच्या गुप्तहेरांनी सुरू केलेल्या एका धाडसी आणि गोपनीय मिशनचे चित्रण त्यात आहे.
फोन भूत हा अगदी वेगळा विनोदी भयपट आहे. त्यात एकाच वेळी गोंधळ, मस्ती, भीती आणि हास्य यांचा संगम झाला आहे. घर के बच्चों से लेकर घरके बडों तक और दादा-दादीं तक भूत से तो सभीं डरते हैं. पण कत्रिना कैफ एका खट्याळ भुताचे रूप घेते, तेव्हा आता आपली चांगलीच करमणूक होणार, याची तुम्ही खूणगाठ बांधता!
या चित्रपटात सिध्दान्त चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्यातील सखोल मैत्रीचे दर्शन घडते. हे दोघेही बेरोजगार असून त्यांना भुताचे चित्रपट पाहण्याचे वेड आहे. अपना भिडू जॅकी श्रॉफ आणि शीबा चढ्ढा हेही यात प्रमुख भूमिकेत असतील. तो जब भूत सताए, तो फोन भूत को कॉल कीजिए.
“ह्या चित्रपटाचे शूटिंग हा एक मजेदार अनुभव होता. प्रत्येकजण हॉरर कॉमेडीवर एकत्र काम करण्यासाठी समान पद्धतीने रोमांचित आणि उत्साहित होते. आता जेव्हा हा चित्रपट झी सिनेमावर प्रीमिअर होत आहे, तेव्हा प्रेक्षक ह्या कॉमेडी ऑफ एरर्ससाठी सज्ज होऊ शकतात. ही एक क्रेझी रोलर कोस्टर राईड आहे जी निश्चितपणे तुमचे मनोरंजन करेल. ” असे कत्रिना म्हणाली.
- 27 मे रोजी रात्री 8.00 वाजता पाहा ‘मिशन मजनू’ आणि 28 मे रोजी दुपारी 12.00 वाजता अनुक्रमे ‘मिशन मजनू’ आणि ‘फोन भूत’ या चित्रपटांचे जागतिक टीव्ही प्रीमिअर फक्त ‘झी सिनेमा’वर!