15.4 C
New York
Wednesday, Nov 20, 2024
Bharat Mirror Marathi
क्रीडा शिक्षा

आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी मिनीगोल्फ संघात बामखेडा येथील श्रीकृष्ण बारीची निवड

नंदुरबार : ग्रामविकास विकास संस्थेच्या कला महाविद्यालयातील एम.ए.इग्रजी प्रथम वर्गातील श्रीकृष्ण नितीन बारी या विद्यार्थ्याची राजस्थान येथील झुनझुनवाला विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्तरावर क्रीडा स्पर्धेसाठी मिनीगोल्फ क्रीडा प्रकारात नंदुरबार जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांची विद्यापीठ संघात निवड करण्यात आली. ही निवड राष्ट्रीय स्पर्धे करिता झाल्याने सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

या स्पर्धेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यापीठाच्या संघात श्रीकृष्ण नितीन बारी याची आंतर विद्यापीठ संघात निवड करण्यात आली आहे.या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष  पी. बी. पटेल, उपाध्यक्ष डॉ. के.एच. चौधरी, सचिव बी.व्ही. चौधरी, संचालक मंडळ प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील , प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी तसेच संस्थेतील विविध शाखा प्रमुखांनी विशेष कौतुक केले आहे.तसेच या विद्यार्थ्याला क्रीडा संचालक डॉ. पी. जे. पटेल यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Related posts

लक्कडकोट तालुका शहादा येथे राष्ट्रीय हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन दिमाखात संपन्न

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

BM Marathi

बामखेडा रासेयो श्रमसंस्कार शिबिराला मान्यवरांच्या भेटी

BM Marathi

Leave a Comment