शहादा: ग्रामविकास संस्था संचलित कला महाविद्यालय बामखेडा त. त. ता. शहादा जि. नंदुरबार येथील संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर बापू वाघ यांना मालवांचल विद्यापीठातून संरक्षण व सामरिक शास्त्र या विषयात त्यांनी “कौटिल्याची राष्ट्र आणि आंतराष्ट्रीय युद्धाविषयीची चिकित्सा” या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता. त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉ. एस. जे. भामरे सर नंदुरबार यांचे मार्गदर्शन लाभले होते.
प्रा.डी.बी.वाघसरांच्या या यशा बद्दल ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री पी.बी.पटेल उपाध्यक्ष मा.श्री के.एच.चौधरी, सचिव मा.श्री.बी.व्ही.चौधरी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य एस.पी.पाटील विशेष कौतुक आणि अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
सदर विषयावर अभ्यास करीत असताना डॉ. योगेश पाटील ,डॉ. आर. एस. जगताप , डॉ. बी. टी. चौधरी , यांनी मोलाची मदत केली आहे. सदर यशा बदल प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर कर्मचारी बंधूंनी अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या.