शहादा, ग्रामविकास संस्थेच्या कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाने राष्ट्रीय सेवा योजना उत्साह सप्ताह निमित्ताने दिनांक २४ सष्टेबर ते ३० सप्टेंबर २०२२ याकाळात विविध कार्यक्रम संपन्न झाले.यात दिनांक २४ सप्टेंबर रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.त्याच दिवशी नंतर सायंकाळी ०५-३० वाजता आस्था गुप्ता वेगेन ऑफ स्टडीज, पुणे या सेवाभावी संस्थेने घेतलेल्या ‘फूड प्लेनेट हेल्थ’ या अत्यंत मौलिक विषयाच्यावरच्या आभासी कार्यशाळेत बहूसंख्य विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.
दुसऱ्या दिवसापासून स्वयंसेवकांनी आपापल्याला विभागून दिलेली विविध कामे केली.त्यात विद्यार्थी ज्या गावात राहतात तेथे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यासंदर्भात नागरिकामध्ये प्रचार व जनजागृती केली. त्याचप्रमाणे गावातील आशा वर्कर अंगणवाडी सेविकांना पोषण महा.राबविण्या संदर्भात सहकार्य केले.
आज विविध प्राण्यांच्या संदर्भातील विशेषतः गाय,बैलांवर दिसून येणारा लंप्मी आजार या आजाराबद्दल लसीकरण करणे किती महत्त्वाचे आहे. याबाबतीत विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना मौलिक माहिती देऊन जाणिवजाग्रुती केली.
अशा प्रकारे गेल्या सात दिवसात विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्स्फुर्त कार्याबद्दल ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मा.पी.बी. पटेल, उपाध्यक्ष मा.डॉ.के.एच. चौधरी, संस्थेचे सचिव मा.बी.व्ही. चौधरी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.सदर कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सी. एस. करंके यांनी केलेले आहे.