औरंगाबाद – दि २० जुलै ते ३१ जुलै २०२२ या दरम्यान मराठवाड्यातील ३० गावातून व सर्व जिल्ह्यातून “वित्तीय समावेशन व आर्थिक साक्षरता अभियान ” ५५० कि मी सायकल रॅली बँकेच्या १३ व्या वर्धापन दिन तसेच स्वातंत्राचा अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित करीत आहोत . या अभियानचे आयोजन महाराष्ट्र ग्रामीण बँक व नाबार्ड मार्फत केले आहे.
मराठवाड्यातील आर्थिक साक्षरता व वित्तीन सामावेशन , सामाजिक सुरक्षा योजनाचा प्रचार व प्रसार , शंभर टक्के पिक कर्ज नूतनीकरण – वितरण , महाग्रमीण बळीराजा तारणहार योजना इ विषय घेऊन हि चेतना सायकल रॅलीला आज औरंगाबाद येथील बँकेच्या मुख्य कार्यालयापासून प्रारंभ झाला आहे.
चेतना सायकल रॅली सुरवात बँकेच्या औरंगाबाद येथील मुख्य कार्यालयातून दि २० जुलै रोजी सकाळी ६.३० वा नाबार्ड चे सरव्यवस्थापक एम जे श्रीनिवासुलू तसेच औरंगाबादचे जिल्हाधिकारी श्री . सुनील चव्हाण यांच्या हस्ते झाले आहे . तसेच याप्रसंगी बँकेची सुविधा गतिमान करण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते 5 नवीन वाहने क्षेत्रीय व्यवस्थापकांना हस्तांतरित करण्यात आले.
सायकल रॅली औरंगाबाद , जालना , बीड , परभणी , नांदेड , लातूर या जिल्ह्यातून जाऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे या रॅली चा समारोप दि ३१ जुलै रोजी होणार आहे . बँकेच्या तीस एक शाखातून हि रॅली जाणार असून शंभरावर गावातून मेळावे घेण्यात येणार आहेत ,
महाराष्ट्र ग्रामीण बँकेने या खरीप हंगामात आज पर्यंत २०८२८२ शेतकरी बांधवाना रु १७५६ कोटीचे पिक कर्ज किसान क्रेडीट कार्ड योजने अंतर्गत वाटप केले आहेत . मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. बॅंकेच्या वर्धापनदिन निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून मुख्य कार्यालय औरंगाबाद येथे रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.
थकीत पिक कर्ज सवलतीत परतफेड व पुन्हा नवीन पिक कर्ज अशी अभिनव “ महाग्रमीण बळीराजा तारणहार योजना” बँके मार्फत राबविण्यात येत आहे. त्याचा लाभ शेतकरी बांधवाना मिळावा , भारत सरकार मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक सुरक्षा योजना चा लाभ ग्रामीण भागातील लाभार्थी पर्यंत पोहचावा त्याच प्रमाणे डिजिटल बँकिंग व आर्थिक साक्षरता , वित्तीय सामावेशन यासाठी या सायकल रॅली १०० च्या वर मेळावे घेण्यात येत आहेत. या सायकल रॅली मध्ये बँकेचे अध्यक्ष , मुख्य सरव्यवस्थापक , सर व्यवस्थापक , मुख्य व्यवस्थापक , क्षेत्रीय व्यवस्थापक यासह अधिकारी सहभागी झालेले आहेत .
या उपक्रमात वित्तीय समावेश व आर्थिक साक्षरता मेळावा घेण्यात येणार आहेत .या मेळाव्यात बहुसंख्येने ग्रामीण व शहरी नागरिकानी सहभागी व्हावे असे आवाहन बँकेचे अध्यक्ष श्री मिलिंद घारड यांनी केले तसेच यावेळी क्षेत्रीय व्यवस्थापक, शाखाव्यवस्थापक बँक कर्मचारी व अधिकारी , प्रतिष्ठित नागरिक व खातेदार , लिड बँक अधिकारी, जिल्हा विकास अधिकारी नाबार्ड आदि मान्यवर उपस्थित होते.