नंदुरबार: श्री साईबाबा भक्त मंडळ संचालित ,कला वरिष्ठ महाविद्यालय म्हसावद महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य.एम. आर पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. संगीता पटेल होते .आपल्या मार्गदर्शन पर भाषणात प्रा. पटेल यांनी बदलत्या परिस्थितीत आव्हाने आणि महिलांची भूमिका व वाटचाल विषयी माहिती दिली.महिलांची कुटुंबातील सुधारणेचा दृष्टिकोन बाळगावा. शिक्षणाचा आग्रह धरला पाहिजे.
प्रा. ज्ञानेश्वर गवळे यांनी जागतिक महिला दिन साजरा करण्यात मागील इतिहास सांगितला. प्राचीन काळापासून महिलांची समाजातील आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महिलांचे योगदानाबद्दल माहिती दिली.प्रा. अशोक गिरासे यांनी स्त्री भ्रूण हत्या आणि स्त्रियांच्या मनोवैज्ञानिक भूमिकेची चर्चा केली. प्रा. गुंजाळ यांनी स्त्री शक्तीचा जागर आणि साडेतीन ज्ञानपीठ विषयी माहिती दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्र. प्राचार्य. एम. आर पाटील म्हणाले की, आधुनिक काळातील स्त्रिया प्रगतीच्या प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत .आपली भूमिका सिद्ध करीत आहेत. आणि पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून प्रगतीचे शिखर गाठत आहेत. खेड्यातील विद्यार्थिनींनी लाजरेपणा सोडून प्रत्येक उपक्रमात सहभागी नोंदविला पाहिजे. ज्यामुळे भविष्यात अनेक गोष्टी सोयीस्कर होतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर गवळे यांनी केले. तर आभार प्रा. श्रीराम बनसोडे यांनी मानले.
प्रभारी प्राचार्य मनोज पाटील , एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. संगीता पटेल सहा कार्यक्रम अधिकारी प्रा. अशोक गिरासे अर्थशास्त्र विभागाचे प्रा.श्रीराम बनसोडे सहा.प्रा. ज्ञानेश्वर गवळे सहा प्रा. कविता भिलावे प्रा. गणेश पवार शिक्षकेतर कर्मचारी हेमराज पाटील अविनाश पाटील जितेंद्र पाडवी , गणेश पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमा बद्दल आप्पासाहेब विठ्ठल हिरजी चौधरी संस्थेचे उपाध्यक्ष धारुभाई सदाशिव पाटील, सचिव गणेश नरोत्तम पाटील, तसेच संचालक मंडळाने कौतुक केले.