7.3 C
New York
Monday, Oct 27, 2025
Bharat Mirror Marathi
नंदुरबार

बामखेडा महाविद्यालयात संविधान दिन कार्यक्रम संपन्न

बामखेडा येथील ग्राम विकास संस्थेच्या कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याचे मूलाधार ‘संविधान’ या संदर्भात कार्यक्रम उत्साहाने संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रो.डॉ. आर. एस. जगताप,कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य.डॉ.एस. पी. पाटील, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉ. के.पी.पाटील हे मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांनी संविधानाचे पूजन केले.

त्यानंतर प्रमुख वक्ते प्रो.डॉ. आर.एस. जगताप यांनी संविधान हे भारतीय स्वातंत्र्याचे मूलाधार असून प्रत्येकाने संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे धर्मनिरपेक्षता जपून योग्य तो समाजवाद फुलवावा.न्याय,स्वातंत्र्य,समता, बंधुता,व्यक्तीची प्रतिष्ठा जपणे, श्रद्धा व विश्वसनीयता या संविधानिक मूल्यांची प्रत्येकाने पालन केल्यास राष्ट्रांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊ शकेल; यासाठी मार्गदर्शक म्हणून प्रत्येक नागरिकाने संविधानाचा अंगीकार करावा असे आवाहन केले.

त्यानंतर राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. के.पी. पाटील यांनी सर्व उपस्थितांसह संविधानाचे वाचन केले. प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी भारतीय लोकशाहीचा आधार असलेल्या संविधानाचे पालन करून त्याप्रमाणे वर्तन करणे हे आपल्या सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे हे अनेक उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. प्रत्येकाने संविधानाचा आदर ठेवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. प्रा.ए.एम. गोसावी यांनी आभार प्रकटन केले व विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ.बी.एन.गिरासे यांनी सूत्रसंचालन केले.

Related posts

बामखेडा महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

BM Marathi

लक्कडकोट तालुका शहादा येथे राष्ट्रीय हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन दिमाखात संपन्न

BM Marathi

क्रांती दिन व विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा

BM Marathi

Leave a Comment