Bharat Mirror Marathi
सुरत

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांचे पुत्र जिग्नेश पाटील सिनेट निवडणूक लढवणार

सुरत, वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सिनेट निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. यासोबतच डोनर जागेसाठी दोन उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांचे पुत्र जिग्नेश पाटील प्रथमच विद्यापीठ सिनेटमध्ये निवडणूक लढवणार आहेत. जिग्नेश पाटील सक्रिय राजकारणात येण्याची चिन्हे आहेत. जिग्नेश पाटील डोनर जागेवरून उमेदवारी दाखल करणार आहेत.

सिनेट निवडणुकीसाठी अभाविपचे उमेदवार

वाणिज्य- प्रद्युम्न जरीवाला

कला- कानू भारवाड

शिक्षण- भार्गव राजपूत

व्यवस्थापन- दिशान्त

विज्ञान- अमित

कंम्प्युटर विज्ञान- गणपत भाई

भाविन भाई

आर्किटेक- भुवनेश

होमिओ- डॉ. सतीश पटेल

मेडिकल- डॉ चेतन पटेल

डोनर विभागाच्या दोन जागांवर डॉ कश्यप खरचिया, जिग्नेश पाटील

Related posts

60 लाखांचे सोने घेऊन फरार झालेला वृद्ध व्यवस्थापक तब्बल 13 वर्षांनंतर महाराष्ट्रातून पकडला गेला

BM Marathi

श्री मराठा पाटील समाज मंडळ सुरत प्रमुखपदी छोटू पाटील यांची निवड

BM Marathi

उधन्यात तरुणाचा तर भेस्तानात महिलेचा वाहन अपघातात मृत्यू

BM Marathi

Leave a Comment