नंदुरबार : ग्रामविकास संस्थेच्या कला महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने दि.03 जून 24 रोजी बांबू आधारित कृषी विकास व स्वयंरोजगार या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
सदर कार्यशाळेचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष पी.बी. पटेल होते, उद्घाटक म्हणून संस्थेचे सचिव बी व्ही. चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. के. एस. चौधरी उपस्थित होते. तसेच मार्गदर्शक म्हणून आर. डी. पाटील माजी वनक्षेत्रपाल ,उमेश सोनार पारोळा तसेच वनपरीक्षेत्र अधिकारी आशुतोष मेढे इत्यादी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच. एम. पाटील यांनी बांबू विकास व स्वयंरोजगार या कार्यशाळे संबंधी भूमिका स्पष्ट केली त्यात त्यांनी स्वयंरोजगार बद्दल बांबूचे विविध वस्तू कशा बनवल्या जातात याविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच उद्घाटक म्हणून संस्थेचे सचिव बी.व्ही. चौधरी यांनी कार्यशाळेत. सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्ष भाषण करताना पी.बी. पटेल यांनी बांबू ही वस्तू किती महत्त्वाच्या आहे तिचे महत्त्व आजच्या काळात किती महत्त्वाचे आहे.याविषयी विवेचन केले. तसेच शेतकऱ्याने बांबू लागवड किती फायदाची आहे या गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकला. त्यानंतर कार्यशाळेचे दुसऱ्या सत्र श्री आर. डी. पाटील यांनी बांबू लागवड काळाची गरज या मार्गदर्शन करतांना म्हणाले की बांबू या वनस्पती बद्दल जगात जे विविध प्रकार आहेत. आणि भारतात कोणकोणत्या प्रकारचे बांबूच्या उपजाती आहेत यांच्यावर प्रकाश टाकला.
तसेच बांबू उत्पादन शेतकऱ्यांसाठी किती फायद्याचे आहे याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती स्पष्ट केली.येथील स्थानिक मजुरांना रोजगाराभिमुख कसं होता येईल असे अनेक गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकला व शेवटी विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता कशी विकसित होईल याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात उमेश सोनार यांनी बांबू व्यवस्थापन काळजी व उत्पादन प्रक्रिया व स्वयंरोजगार या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की बांबूच्या लागवड करण्याकरता कोणत्या जमिनीची आवश्यकता असते त्याचे संगोपन कसे केले पाहिजे तसेच बांबूची विक्री व मार्केट आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध वस्तू या कशाप्रकारे विकल्या जातात याबद्दल शासनाच्या विविध योजनांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली व विद्यार्थ्यांच्या शंका समाधान व प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या शेवटी आशुतोष मेढे, वनक्षेत्रपाल शहादा यांनी *बांबू पासून विविध कलात्मक वस्तू उत्पादने : स्वयंरोजगार* या विषयावर मार्गदर्शन केले.आजची कार्यशाळा किती महत्त्वाची आहे.याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी बांबू लागवड किती महत्त्वाची आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला व शेवटी समारोपात विद्यार्थ्यांना या कार्यशाळेपासून काय फायदा होईल आणि स्वयंरोजगार कसा स्वतःचा निर्माण करता येईल व स्वतः मालक कसे होणार अशा अनेक गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकला .
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी. एन. गिरासे यांनी केले तर आभार प्रकटन डॉ. सी. एस. करंके यांनी केले सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष डाॅ के एच चौधरी व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग क.ब.चौ उ.म वि जळगांव संचालक .प्रा डाॅ आशुतोष पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला बचत महिला, अंगणवाडी सेविका,विद्यार्थी विद्यार्थीनी आदि सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.